Akshay Kumar, Sunil Shetty and Paresh Rawal to be seen in Hera Ferry 3? | हेरा फेरी ३ मध्ये झळकणार अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल?

हेरा फेरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या तिकडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. या चित्रपटातील तिघांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. य चित्रपटातील अनेक संवाद तर आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर याच तिकीडीला घेऊन निर्मात्यांनी फिर हेरा फेरी हा हेरी फेरीचा दुसरा भाग बनवला होता. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.
हेरी फेरी या चित्रपटानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होती. हेरा फेरी ३ या चित्रपटावर काम अनेक वर्षांपूर्वीच सुरू झाले होते. पण या चित्रपटाचे लेखक नीरज वोरा कोमात गेल्यामुळे या चित्रपटाचे काम थांबले होते. काहीच महिन्यांपूर्वी नीरज यांचे निधन झाले. आता या चित्रपटाच्या तयारीला नव्याने सुरुवात झाली आहे. हेरा फेरी ३ या चित्रपटात अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत नसल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. पण हेरा फेरी या चित्रपटाच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातदेखील अक्षय, सुनील आणि परेश यांची तिकडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. अक्षयने काही दिवसांपूर्वी सुनीलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून नुकतीच त्या दोघांची भेट झाली असल्याचे म्हटले होते. त्यावरून हे दोघे या चित्रपटासाठी एकत्र आले असल्याची चर्चा रंगली आहे. 
हेरा फेरी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा पुढील काहीच दिवसांत होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन आणि निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्यात दरम्यानच्या काळात काही वाद झाले होते. पण आता हे वाद मिटल्यामुळे ते दोघे पुन्हा एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे. याविषयी फिरोज नाडियाडवाला यांनी सांगितले आहे की, आम्ही या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करत असून दोन आठवड्यात या चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा करणार आहोत. 
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे तिघे हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात देखील एकत्र आले तर प्रेक्षकांसाठी ती पर्वणीच ठरणार आहे. 

Also Read : पुढच्या वर्षी फ्लोरवर येणार 'वेलकम3'?
Web Title: Akshay Kumar, Sunil Shetty and Paresh Rawal to be seen in Hera Ferry 3?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.