akshay kumar reveal worst stunt scenes experience before 21 year | २१ वर्षांपूर्वीचा ‘हा’ स्टंट होता अक्षय कुमारच्या करिअरमधील सर्वात वाईट स्टंट!!
२१ वर्षांपूर्वीचा ‘हा’ स्टंट होता अक्षय कुमारच्या करिअरमधील सर्वात वाईट स्टंट!!

ठळक मुद्देआज मी ५१ वर्षांचा आहे. आणखी पाच वर्षे तरी मी स्टंट करणार. पण एका वयानंतर तुम्ही स्वत:ला जोखमीत टाकू शकत नाही. या वयात स्वत:ला फिट ठेवणे माझ्यापुढे आव्हान आहे. यासाठी मी फिजिओथेरपी करतो. कडक डाएट फॉलो करतो, असे त्याने सांगितले.

अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा आगामी चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आहे. १८९७ च्या सारागढी युद्धावर आधारित या सिनेमात अक्षयने जबरदस्त स्टंट केले आहेत, साहजिकच चाहते अक्षयचा अ‍ॅक्शन अवतार पाहण्यास उत्सूक आहेत. बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखल्या जाणा-या अक्षयने आपल्या सिने करिअरमध्ये अनेक धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्स दिलेत. पण एक अ‍ॅक्शन स्टंट मात्र त्याच्या करिअरमधील आजपर्यंतचा सर्वात वाईट स्टंट आहे. हे आम्ही नाही तर स्वत: अक्षयचे मत आहे.


होय, एका ताज्या मुलाखतीत अक्षयने या सर्वाधिक वाईट स्टंटबद्दल सांगितले.  १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंगारे’ या चित्रपटात मी सर्वात वाईट स्टंट केला होता, असे अक्षयने यावेळी सांगितले. तो म्हणाला की, या सीनमध्ये मला एका इमारतीवरून दुसºया इमारतीवर उडी घ्यायची होती. तो सीन करण्यापूर्वी मी अर्धा दिवस विचार केला. त्याकाळात आजच्यासारखी सपोर्ट सिस्टम नव्हती. साहजिकच तो स्टंट करणे सोपे नव्हते. मी तो स्टंट केला. पण माझ्यामते, माझ्या करिअरमधील तो सर्वात वाईट स्टंट होता.


स्टंट करणे मला मनापासून आवडते, हेही अक्षयने सांगितले. ‘बंदर का बच्चा है तो गुलाटी मारना नहीं भूल सकता’, असेच काही माझ्याबद्दल आहे. माझ्या आजोबांनी मला कुस्ती शिकवली. यानंतर मी मार्शल आर्ट शिकलो. हे सगळे करताना मला आनंद होतो. मी स्टंट प्रचंड एन्जॉय करतो,असेही तो म्हणाला.
अक्षयने अलीकडे डिजिटल दुनियेत पाऊल ठेवले. अक्षयची पहिली वेब सीरिज ‘दी एण्ड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्येही अक्षय जबरदस्त स्टंट करताना दिसला होता. शरीराला आग लावून तो रॅम्पवर उतरला होता. या स्टंटबद्दलही अक्षय बोलला. तो स्टंट करणे सोपे नव्हते. अशा स्टंटमध्ये श्वास कसा घ्यायचा, हे महत्त्वाचे असते. कारण हवा ज्या दिशेने वाहते, त्यादिशेने आग पसरते. आज मी ५१ वर्षांचा आहे. आणखी पाच वर्षे तरी मी स्टंट करणार. पण एका वयानंतर तुम्ही स्वत:ला जोखमीत टाकू शकत नाही. या वयात स्वत:ला फिट ठेवणे माझ्यापुढे आव्हान आहे. यासाठी मी फिजिओथेरपी करतो. कडक डाएट फॉलो करतो, असे त्याने सांगितले.


Web Title: akshay kumar reveal worst stunt scenes experience before 21 year
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.