कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत अक्षय कुमार बोलला खोटा?... वाचा काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:38 PM2019-05-08T12:38:06+5:302019-05-08T12:41:03+5:30

अक्षयने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, ''माझ्या नागरिकत्वाबाबत एवढी रुची का दाखवली जात आहे. त्यावरून विनाकारण नकारात्मक संदेश का पसरवले जात आहेत.

akshay kumar lying about canadian citizenship? | कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत अक्षय कुमार बोलला खोटा?... वाचा काय आहे सत्य

कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत अक्षय कुमार बोलला खोटा?... वाचा काय आहे सत्य

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षयने नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे सांगितले आहे. पण अक्षयला कॅनडाच्या सरकारने सन्मानाने नागरिकत्व दिले असेल तर त्याच्याकडे पासपोर्ट असणे अशक्य आहे हा दावा लल्लनटॉपने केला आहे.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी नुकताच मतदानाचा हक्क बजावला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेणारा अक्षय कुमार मतदान करताना दिसला नाही. त्याने मतदान केले का? अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. काही पत्रकारांनी देखील अक्षय कुमारला याबाबत प्रश्नही विचारला होता. त्यावर अक्षयने उत्तर देण्याचं टाळलं. मात्र अक्षयने काही दिवसांपूर्वी ट्वीट करून कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत मौन सोडलं. 

अक्षयने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, ''माझ्या नागरिकत्वाबाबत एवढी रुची का दाखवली जात आहे. त्यावरून विनाकारण नकारात्मक संदेश का पसरवले जात आहेत. मी माझ्या कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत कधीही लपवलेले नाहीये. माझ्याजवळ कॅनडाचा पासपोर्टही आहे. तसेच, हेही सत्य आहे की, मी गेल्या सात वर्षांत एकदाही कॅनडाला गेलो नाही. मी भारतात काम करतो आणि भारतातच टॅक्स भरतो,'' 



 

पण अक्षयने त्याच्या नागरिकत्वाबाबत खोटे सांगितले असल्याचे लल्नटॉप वेबसाईटने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. त्यांच्या वृत्तानुसार, अक्षयला कॅनडाचे नागरिकत्व सन्मानाच्या रूपात देण्यात आले. अक्षयनेच टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ही गोष्ट सांगितली होती. त्याने टाईम्स नाऊ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याला कॅनडाचे नागरिकत्व सन्मानार्थ मिळाले आहे याचा सगळ्या भारतीयांना गर्व असला पाहिजे. 

2017 मध्ये देखील जॉनी एलएलबी या चित्रपटाच्या प्रमोशच्यावेळी देखील त्याला हाच प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा देखील हे नागरिकत्व सन्मानार्थ मिळाले असेच त्याने सांगितले होते. 

अक्षयने नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे सांगितले आहे. पण अक्षयला कॅनडाच्या सरकारने सन्मानाने नागरिकत्व दिले असेल तर त्याच्याकडे पासपोर्ट असणे अशक्य आहे हा दावा लल्लनटॉपने केला आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, कॅनडात कोणत्याही व्यक्तीला सन्मानार्थ नागरिकत्व देण्याच्या अटी खूपच कठीण आहेत. स्वातंत्र्यासाठी लढणारे अथवा स्वातंत्र्याचा विचार पसरवण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांना हा सन्मान दिला जातो. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या वेबसाईटवर या गोष्टीविषयी नमूद देखील करण्यात आले आहे. आजपर्यंत कॅनडात सन्मार्थ केवळ सहा लोकांना कॅनडाचे नागरिकत्व देण्यात आले आहे. त्यांची नावे देखील तिथे नमूद आहेत. या नावांमध्ये राओल वॉलेनबर्ग (स्वीडन), नेल्सन मंडेला (साऊथ आफ्रिका), 14 वे दलाई लामा (तिब्बत) आंग सान सू की (म्यानमार), आगा खान (ब्रिटीश) मलाला युसुफजई (पाकिस्तान) याच लोकांची नावे आहेत. यामध्ये कुठेही अक्षय कुमारच्या नावाचा समावेश नाहीये. 

मलालाला कॅनडाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अल जजीराने दिलेल्या बातमीनुसार, कॅनडाचे नागरिकत्व मिळणे हा केवळ सांकेतिक सन्मान असतो. यासोबत कोणतेही विशेष अधिकार मिळत नाहीत. हे नागरिकत्व मिळणाऱ्या लोकांना कॅनडाचा पासपोर्ट मिळत नाही. तसेच त्यांना तिथे मतदान करण्याचा देखील अधिकार नसतो. त्यामुळेच अक्षयला हे नागरिकत्व सन्मानार्थ न मिळता त्याने स्वतःच पासपोर्ट बनवला असल्याचे लल्नटॉपने त्यांच्या बातमीत म्हटले आहे. 

अक्षयने त्याच्या ट्वीटमध्ये आणखी एक गोष्ट म्हटली आहे की, तो गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडाला गेलाच नाहीये. पण युट्युबवरील त्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून त्यात तो रिटार्यमेंटनंतर कॅनडातच स्थायिक होण्याविषयी बोलत आहे. 

Web Title: akshay kumar lying about canadian citizenship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.