अक्षय कुमार ट्विंकलच्‍या किचनचा राजा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 12:40 PM2018-11-22T12:40:51+5:302018-11-22T12:41:37+5:30

ट्विंकल व अक्षयने नुकतेच अदानी विल्‍मरच्‍या फॉर्च्‍युन बिर्यानी क्‍लासिक बासमती राइससाठी एका जाहिरातीचे चित्रीकरण केले.

Akshay Kumar is the King of Twinkle's Kitchen | अक्षय कुमार ट्विंकलच्‍या किचनचा राजा

अक्षय कुमार ट्विंकलच्‍या किचनचा राजा

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षय कुमार स्‍वत:ला मनापासून मानतो शेफ

अक्षय कुमार हा अजूनही स्‍वत:ला मनापासून शेफ मानतो. तो आपल्‍या शेफच्‍या कौशल्‍यांसह पत्‍नीच्‍या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्‍य आणतो. अदानी विल्‍मरसाठी एका जाहीरातीच्‍या चित्रीकरणादरम्‍यान खिलाडी त्‍याच्‍या बावर्ची अवतारामध्‍ये दिसला. 

ट्विंकल व अक्षयने नुकतेच अदानी विल्‍मरच्‍या फॉर्च्‍युन बिर्यानी क्‍लासिक बासमती राइससाठी एका जाहिरातीचे चित्रीकरण केले. यात अक्षय कुमार या जाहिरातीत त्‍याची पत्‍नी ट्विंकल खन्‍नासाठी बियार्नी बनवत होता. कूकिंगसाठी त्‍याची आवड कामासाठीच्‍या त्‍याच्‍या निवडीमध्‍ये, विशेषत: रिअॅलिटी शो मास्‍टर शेफ इंडियासह त्‍याच्‍या सहयोगामध्‍ये दिसून आला. तसेच फॉर्च्‍युन ऑईलसाठी जाहिरात कॅम्‍पेन घर का खाना, घर का खाना होता है यामध्‍ये देखील त्‍याची कूकिंगची असलेली आवड दिसून येते. 
चित्रीकरणादरम्‍यान ट्विंकल म्‍हणाली, अन्‍न हे कोणत्‍याही घरासाठी अत्‍यंत महत्‍त्‍वपूर्ण आहे. आमच्‍या किचनवर माझ्यापेक्षा अधिक अक्षयचे प्रभुत्‍व असते. त्‍याला कुकिंग करायला आवडते आणि मला खायला खूप आवडते, म्‍हणूनच हे चांगले समीकरण आहे. जवळपास सर्वांनाच माहीत आहे की, अक्षय चित्रपटसृष्‍टीमध्‍ये येण्‍यापूर्वी सुरुवातीच्‍या दिवसांमध्‍ये शेफ म्‍हणून काम करायचा. असे वाटते की आजदेखील तो कूकिंगसाठी असलेल्‍या आवडीसह ट्विंकलच्‍या किचनचा राजा आहे.
अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांच्या जाहिरातीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Akshay Kumar is the King of Twinkle's Kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.