विवेक ऑबेरॉयच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 04:08 PM2019-04-11T16:08:56+5:302019-04-11T16:09:54+5:30

पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

Akshay Kumar Kesari and John Abraham Romeo Akbar Walter will get benefit due to vivek oberoi PM Narendra Modi movie? | विवेक ऑबेरॉयच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार फायदा?

विवेक ऑबेरॉयच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार फायदा?

googlenewsNext
ठळक मुद्देपीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी बायोपिक 11 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडीत यांनी केली आहे. आनंद पंडीत केवळ निर्माते म्हणूनच नाही तर वितरक म्हणूनही भूमिका बजावत आहेत. मात्र त्यांनी पीएम नरेंद्र मोदी बायोपिक केवळ भारतातच नाही, तर इतर देशांतही प्रदर्शित करण्याची योजना आखली होती.

मात्र ती योजना निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे निर्मात्यांसमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या रिलीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर आचारसंहिता भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते. तसेच न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. मात्र निवडणूक आयोगाने नुकताच या चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोख लावला आहे.

पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. जॉन अब्राहमचा रोमिओ अकबर वॉल्टर हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडे सुरुवातीला प्रेक्षकांनी दुर्लक्ष केले होते. पण आता हळूहळू हा चित्रपट चांगले कलेक्शन करत असून या चित्रपटाने आजवर 28 कोटी रुपये कमावले आहेत.

तसेच केसरी या अक्षय कुमारच्या चित्रपटाने आजवर 100 करोडचा गल्ला जमवला असून हा चित्रपट लवकरच 150 करोडचा टप्पा पार करेल अशी आशा वर्तवली जात आहे. हे दोन्ही चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाल करत असल्याने पीएम नरेंद्र मोदी प्रदर्शित न झाल्याचा फायदा या आठवड्यात तरी चित्रपटांना नक्कीच होईल असे म्हटले जात आहे.

Web Title: Akshay Kumar Kesari and John Abraham Romeo Akbar Walter will get benefit due to vivek oberoi PM Narendra Modi movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.