Akita has celebrated an egg party with Aarav, son of success with 'Toilet'! | अक्षयकुमारने ‘टॉयलेट’च्या यशाचे मुलगा आरवसोबत केले अंडा पार्टी सेलिब्रेशन !

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ बॉक्स आॅफिसवर धूम करीत आहे. कारण दुसºया दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने १७.१० कोटी रुपयांची कमाई करीत जबरदस्त मुसंडी मारली आहे. ओपनिंग डेला या चित्रपटाची कमाई १३.१० कोटी इतकी होती. आतापर्यंत चित्रपटाने ३०.२० कोटी रुपयांचा गल्ला जमविला असून, तिसºया दिवशी म्हणजेच रविवारी हा चित्रपट ५० कोटींपेक्षा अधिक कमाई करेल अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान, चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे अक्षय समाधानी असून, त्याचे सेलिब्रेशन तो फॅमिलीबरोबर करीत आहे. होय, अक्षयने सन्डेच्या दिवशी अंडा पार्टी करून आपल्या फॅमिलीबरोबर खूप एन्जॉय केला आहे. 

अक्षयचा फॅमिलीबरोबरच्या सेलिब्रेशनचा एक फोटो सध्या व्हायरल झाला असून, त्यामध्ये अक्षय आणि मुलगा आरव किचनमध्ये अंडा पार्टी करताना दिसत आहेत. अक्षय जेवण बनवित असून, त्याचे संपूर्ण लक्ष मुलगा आरव याच्याकडे आहे. कारण आरव एक अंड फोडत असून, तो ते व्यवस्थित फोडतो काय? याकडे तो लक्ष देत असताना दिसत आहे. खरं तर या फोटोमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, अक्षयकुमार खरोखरच इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत वेगळा आहे. कारण अक्षयऐवजी दुसरा अभिनेता असता तर कदाचित तो फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सेलिबे्रशन करीत असता. मात्र अक्षय आपल्या परिवारासमवेत यशाचे सेलिब्रेशन करीत आहे. 

दरम्यान, अक्षयच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाची कथा प्रेरणादायी असून, प्रेक्षकांना ती भावत आहे. आगरा शहरातील एका छोट्याशा गावात राहणारा केशव पंडितला (अक्षयकुमार) घराच्या आवारात शौचालय बांधण्यासाठी काय धडपड करावी लागते, याचा संघर्ष चित्रपटात दाखविण्यात आला आहे. अक्षयबरोबर भूमी पेडनेकर हिची प्रमुख भूमिका असून, पहिल्यांदाच एकत्र आलेल्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

अक्षयचा हा चित्रपट उत्तर प्रदेश सरकारने टॅक्स फ्री केला असून, इतरही राज्यात तो टॅक्स फ्री दाखविला जावा अशी अक्षयची अपेक्षा होती. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रोजेक्टनंतर तो लगेचच सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर ‘रोबोट’च्या सीक्वलमध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात अक्षय अतिशय वेगळ्या भूमिकेत असून, तो खलनायक साकारत आहे. 
Web Title: Akita has celebrated an egg party with Aarav, son of success with 'Toilet'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.