Ajay Devgn's 'Red', 85-year-old 'Azadi' enters Bollywood; Share the video with Kajol! | अजय देवगणच्या ‘रेड’मधून ८५ वर्षांच्या ‘या’ आजीबार्इंनी केली बॉलिवूडमध्ये एंट्री; काजोलने केला व्हिडीओ शेअर!

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयकर विभागाच्या अधिकाºयाची भूमिका साकारलेल्या अजयचा अंदाज प्रेक्षकांना खूपच भावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या चित्रपटात आणखी एक असे पात्र आहे, ज्याला प्रेक्षक दाद देत आहेत. होय, या चित्रपटातून ८५ वर्षीय पुष्पा जोशी यांनी डेब्यू केला आहे. त्यांनी ‘रेड’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली असून, चित्रपटात त्या सौभर शुक्लाची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या संपूर्ण युनिटने त्यांची प्रचंड काळजी घेतली. आता अजय देवगणची पत्नी आणि बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री काजोलनेही तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांचे कौतुक केले. या व्ंिहडीओमध्ये पुष्पा जोशी चित्रपटांशी संबंधित त्यांचा अनुभव शेअर करताना दिसत आहेत. यावेळी त्यांचा अंदाज बघण्यासारखा आहे. 

व्हिडीओच्या सुरुवातीलाच त्या म्हणतात की, ‘जियो बुढापा ऐसे जैसे बचपन लौटा आज, कटे जिंदगी जैसे बाप के अपना राज...’ यावेळी त्यांनी चित्रपटाबद्दल माहिती सांगताना हा चित्रपट अवश्य बघा असे म्हटले आहे. काजोलने हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे पाहा, अम्मा आली आहे... तिला घरी घेऊन जाण्यासाठी तुमचे मन नक्कीच होणार.’
 

‘रेड’चे दिग्दर्शक राजकुमार गुप्ताने त्यांच्या डेब्यूबद्दल सांगितले की, पुष्पा जोशी सेटवर सर्वांच्याच जवळ होत्या. प्रत्येकाला त्यांचा सहवास हवाहवासा वाटत होता. कारण त्या खूपच चार्मिंग आहेत. तसेच त्यांचा सेन्स आॅफ ह्युमरही जबरदस्त आहे. त्या ८५ वर्षांच्या आहेत. परंतु अशातही त्या पूर्णपणे प्रोफेशनल आहेत. त्यांना त्यांचे सर्व डायलॉग सहज आठवायचे. त्या नेहमीच हसतमुखाने आणि प्रचंड ऊर्जेने सेटवर वावरायच्या. त्यांच्यासोबत काम करणे खरोखरच मजेशीर होते. 

दरम्यान, रेड या चित्रपटात अभिनेता अजय देवगण याच्यासह इलियाना डिक्रूज, सौभर शुक्ला प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने १० कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमविल्याने वीकेण्डमध्ये किती कोटींपर्यंत मजल मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Web Title: Ajay Devgn's 'Red', 85-year-old 'Azadi' enters Bollywood; Share the video with Kajol!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.