Ajay Devgn's Golmaal Again broke Shah Rukh Khan's record! | ​अजय देवगणच्या ‘गोलमाल अगेन’ने तोडला शाहरूख खानचा रेकॉर्ड!

अजय देवगण व परिणीती चोप्रा स्टारर ‘गोलमाल अगेन’ बॉक्सआॅफिसवर रिलीज झाला आणि केवळ इतकेच नाही तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ८० टक्के आॅक्यूपेन्सी रेटही नोंदवला. यावरून या दिवाळीत ‘गोलमाल अगेन’ कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडणार, अशी आशा वाटू लागलीय. कारण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने शाहरूख खानच्या ‘रईस’चा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. याचवर्षी शाहरूखचा हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी शाहरूखचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबील’ असा मुकाबला बॉक्सआॅफिसवर रंगला होता. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘गोलमाल अगेन’चाही अशाच एका चित्रपटाची बॉक्सआॅफिसवर संघर्ष पाहायला मिळतो आहे. हा चित्रपट म्हणजे, आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार.’  पण या संघर्षात ‘गोलमाल अगेन’ने बाजी मारली आहे. तेही शाहरूखच्या ‘रईस’चा विक्रम मोडून. म्हणजेच, पहिल्या दिवशीच्या आॅक्यूपेन्सी रेटच्याबाबतीत ‘रईस’ला ‘गोलमाल अगेन’ने मागे टाकले आहे. ट्रेड एक्सपर्टचे मानाल तर ही सुरुवात ‘गोलमाल अगेन’साठी चांगली सुरुवात आहे. एकूण ३००० स्क्रीनवर रिलीज झालेला ‘गोलमाल अगेन’चा पहिला मॉर्निंग शो प्रेक्षकांनी फुल्ल होता. यंदा ‘बाहुबली2’नंतर बॉक्सआॅफिसवर जितकेही सिनेमे रिलीज झालेत, ते दणादण आपटले. शाहरूखचाच ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि सलमानचा ‘ट्यूबलाईट’ला तर प्रेक्षकांचा अतिशय वाईट प्रतिसाद मिळाला. पण हे ग्रहण ‘गोलमाल अगेन’ने सुटेल, असे चित्र निर्माण झाले आहे. एकंदर काय तर ही दिवाळी टीम अजयच्या नावावर असेल, असे म्हणायला हरकत नाही.

‘गोलमाल अगेन’ या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमु, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, परिणीती चोप्रा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीचे आहे. ‘गोलमाल ’चे सीरिजचे आजवरचे सगळेच सिनेमे हिट गेले आहेत. ‘गोलमाल ’सीरीजमधला पहिला चित्रपट ‘गोलमाल ’ सन २००६ मध्ये आला होता.  त्यानंतर प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतराने ‘गोलमाल रिटर्न्स’आणि ‘गोलमाल 3’ रिलीज झाले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘गोलमाल अगेन’ घेऊन आला आहे.
Web Title: Ajay Devgn's Golmaal Again broke Shah Rukh Khan's record!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.