Ajay Devgn's Diwali is special because of Golmaal again | गोलमाल अगेनमुळे नाही तर या कारणामुळे खास आहे अजय देवगणची दिवाळी

अजय देवगणसाठी हे वर्ष खूप चांगले ठरते आहे. गेल्या महिन्यात बॉक्स ऑफिसवर बादशाहो चांगली कमाई केली. तर दिवाळी मुहुर्तावर त्याचा गोलमाल अगेन प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. हा गोलमाल सीरिजचा चौथा चित्रपट आहे. आतापर्यंत आलेले गोलमाल सीरिजचे सगळेच चित्रपट हिट ठरले होते. त्यामुळे हा ही चित्रपट हिट जाईल अशी आशा रोहित शेट्टी आणि अजय देवगणला आहे. रोहित आणि अजयच्या जोडीने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड बनवले आहेत. त्यामुळे या दिवाळीत ही जोडी नवे रेकॉर्ड प्रस्थापित करण्यास सज्ज आहे. 

हि दिवाळी अजयसाठी खूप खास आहे. एकिकडे अजय देवगणचा गोलमाल अगेन रिलीज होतो आहे तर दिवाळीच्या सुट्टीसाठी अजयची मुलगी घरी येणार आहे. नुकताच बॉलिवूडलाईफला गोलमाल अगेनच्या निमित्ताने दिलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान अजय म्हणाला की, या दिवाळीत मला डब्बल आनंद मिळणार आहे. एकाकडे माझा चित्रपट रिलीज होतोय तर दुसरीकडे माझी मुलगी न्यासा सिंगापूरवरुन परत येते आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षणासाठी ती परदेशात गेली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर सगळ्या कुटुंबीयासोबत सेलिब्रेशन करायला ती येते आहे. अजय आपल्या मुली बाबत नेहमीच खूप प्रोटेक्टिव्ह दिसला आहे. ऐवढचे नाहीत तर अजयच्या सगळ्या चित्रपटांची त्यांची मुलगीच पहिली क्रिटिक्स असते. 


ALSO READ :  Golmaal Again title track: ​ २६ वर्षे जुन्या स्टाईलमध्ये दिसला अजय देवगण!

सध्या अजय देवगण गोलमालच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. या शोच्या प्रमोशनसाठी अजय सगळ्या रिअॅलिटी शोमध्ये जाताना दिसतो आहे.  हा एक हॉरर कॉमेडीपट आहे. गोलमाल अगेनमध्ये अजय देवगण सोबत तब्बू, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमु, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, परिणिती चोप्रा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तब्बू आणि परिणीती पहिल्यांदाच गोलमालच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. परिणीती या चित्रपटाला घेऊन खूपच उत्साहित आहे. गोलमाल अगेनचा ट्रेलर 24 तासांपेक्षा कमी वेळात  २० दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला असल्याचा विक्रम या चित्रपटाने नोंदवला आहे. त्यामुळे चित्रपटाला ही तसाच प्रेक्षक प्रतिसाद देतील. 
Web Title: Ajay Devgn's Diwali is special because of Golmaal again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.