Ajay Devgn will be in love with this actress who is 21 years old! | २१ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पडणार अजय देवगण!

बॉलिवूड असो वा हॉलिवूड अभिनेते आपल्यापेक्षा वयाने निम्म्या असलेल्या अभिनेत्रीबरोबर काम करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक अभिनेता अजय देवगण हादेखील असून, पुन्हा एकदा त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर काम करणार आहे. होय, अजय साउथची सनसनी असलेल्या राकुल प्रित सिंगसोबत लव रंजनच्या रोमॅण्टिक कॉमेडीत बघावयास मिळणार आहे. राकुल प्रित सिंग सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘अय्यारी’ या चित्रपटातही झळकणार आहे. अजय देवगण आणि राकुलच्या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात ती एका शहरी मुलीची भूमिका साकारणार आहे. राकुल प्रीत सिंग मिस इंडिया राहिलेली आहे. या दोन्ही कलाकारांचे वैशिष्ट्ये म्हणजे अजय देवगणचे वय ४८ वर्ष इतके असून, राकुल २७ वर्षांची आहे. 

दरम्यान, अद्यापपर्यंत या चित्रपटाचे टायटल निश्चित करण्यात आले नाही. चित्रपटाला प्रसिद्ध एडिटर अकिव अली दिग्दर्शित करणार आहेत. अकिवने ‘अग्निपथ, गॅगस्टर, लाइफ इन अ मेट्रो, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, बर्फी’ यांसारखे चित्रपट एडिट केले आहेत. 

या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात तब्बूदेखील बघावयास मिळणार आहे. चित्रपटाला टी-सीरिजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार तथा लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग प्रोड्यूस करणार आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार दसºयानिमित्त म्हणजेच १९ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. दरम्यान, गेल्या दिवाळीला रिलीज झालेल्या अजय देवगणच्या ‘गोलमाल अगेन’ने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटात तब्बूनेही त्याच्यासोबत काम केले. 
Web Title: Ajay Devgn will be in love with this actress who is 21 years old!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.