अजय देवगणने अद्यापही बघितलेला नाही काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 06:30 PM2018-09-30T18:30:52+5:302018-09-30T18:31:39+5:30

 होय, काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ हा असा एक चित्रपट आहे, जो तिचा पती अजय देवगणने अद्यापही बघितलेला नाही.

Ajay Devgn hasn’t watched Kajol’s Dilwale Dulhaniya Le Jayenge yet | अजय देवगणने अद्यापही बघितलेला नाही काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’; पण का?

अजय देवगणने अद्यापही बघितलेला नाही काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’; पण का?

googlenewsNext

‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या चित्रपटाने सगळ्यांनाच वेड लावले. प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला. शाहरूख खान आणि काजोलचा हा चित्रपट आठवला तरी मूड रोमॅन्टिक होतो. सर्वाधिक काळ चित्रपटगृहात झळकण्याचा विक्रम नावावर असलेला चित्रपट आजही सिनेप्रेमींच्या मनात घर करून बसला आहे. हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, काजोलची ताजी मुलाखत. या मुलाखतीत काजोलने एक आश्चर्यकारक खुलासा केला. होय, काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ हा असा एक चित्रपट आहे, जो तिचा पती अजय देवगणने अद्यापही बघितलेला नाही.


काजोलने खुद्द हा खुलासा केला. ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ हा माझा असा एक चित्रपट आहे, जो अद्याप अजयने बघितलेला नाही. तू माझा हा चित्रपट का पाहिलेला नाहीस, असा प्रश्न मी आत्तापर्यंत अनेकदा त्याला केला. पण तो कधीच समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ न पाहण्यामागे कारण आहे. पण मी तुला ते सांगणार नाही, एवढेच त्याचे उत्तर असते. माझी इच्छा आहे की तुम्ही (मिडिया) त्याला यामागचे कारण विचारावे आणि ते कळल्यावर मलाही ते सांगावे,असे काजोल या मुलाखतीत म्हणाली.
आता काजोलचा हा  चित्रपट न पाहण्यामागचे कारण काय ते तर अजयलाचं माहित. पण एक मात्र खरे अजयने हा चित्रपट पाहिला नसेल तर काजोलचा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट पाहण्यापासून मुकला आहे, असेचं म्हणायला हवे.

Web Title: Ajay Devgn hasn’t watched Kajol’s Dilwale Dulhaniya Le Jayenge yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.