Aishwarya Takia's response to a triple divorce, reads that you will be thrown !! | तिहेरी तलाकवर आयशा टाकियाची अशी प्रतिक्रिया वाचून तुम्हाला बसेल धक्का!!

गत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकप्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. तिहेरी तलाकविषयी येत्या सहा महिन्यांत कायदा करावा आणि हा कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर बंदी असेल, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयावर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूडही यात मागे नव्हते. अभिनेत्री सलमा आगा, शबाना आझमी, ऋषी कपूर, अनुपम खेर, परेश रावल अशा सगळ्या कलाकारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. केवळ बॉलिवूडच्याच नाही तर अनेक पाकिस्तानी कलाकारांनीही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. एकीकडे या निर्णयानंतर मुस्लिम महिला आनंद साजरा करत असताना एका अभिनेत्रीने मात्र याप्रकरणी दिलेली प्रतिक्रिया तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.

होय, सलमान खानची ‘वॉन्टेड’ अभिनेत्री आयशा टाकिया या निर्णयावर आनंदी आहे की नाही, हे सांगणे तूर्तास कठीण आहे. आयशा टाकियाने समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याच्यासोबत लग्न केलेय. तिहेरी तलाकचा निर्णय तमाम मुस्लिम महिलांसोबत तिच्याशीही निगडीत आहे. पण आयशा मात्र यावर बोलायला तयार नाही. तिहेरी तलाकसंदर्भातील निर्णयावर प्रतिक्रिया विचारली असता, आयशाने बोलण्यास नकार दिला. केवळ ‘नो कमेंट्स’ एवढेच ती म्हणाली. तिची ही प्रतिक्रिया बघता,आयशा या निर्णयाच्या बाजूने आहे की विरोधात, हा प्रश्न पडला आहे. निर्णयाच्या बाजूने असेल तर ती बोलायला का तयार नाही? हाही प्रश्नचं आहे. अर्थात या प्रश्नाची उत्तरे केवळ आयशाकडेच आहेत. 

अलीकडे आयशाचा पती फरहान आझमी चर्चेत आला होता. हिंदू मुलीसोबत लग्न केल्यामुळे आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असा दावा काही दिवसांपूर्वी त्याने केला होता. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून आपल्याला धमकी दिली होती,असे त्याने म्हटले होते.
Web Title: Aishwarya Takia's response to a triple divorce, reads that you will be thrown !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.