Aishwarya Rai gets astonishing roll; Sanjay Dutt's mother can play the role! | ऐश्वर्या रायला मिळाला चकित करणारा रोल; साकारू शकते संजय दत्तच्या आईची भूमिका!

आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आजही इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान कायम ठेवून आहे. कारण आजही ऐशची गणना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. मधल्या काळात ऐश पडद्यावरून गायब झाली होती, त्यानंतर तिने ‘जज्बा’ आणि ‘सरबजीत’ या चित्रपटांतून जबरदस्त कमबॅक केले होते. आता पुन्हा एकदा ऐश आपले जलवे दाखविण्यास सज्ज असून, लवकरच ती आगामी काळात काही प्रोजेक्टमध्ये झळकण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता एक बातमी समोर येत असून, त्यामध्ये ऐशला एक भूमिका आॅफर करण्यात आली असून, ही भूमिका तिच्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का देणारीच म्हणावी लागेल. 

सूत्रानुसार, ऐश्वर्याला प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांची भूमिका आॅफर करण्यात आली आहे. हा चित्रपट १९६७ मध्ये आलेल्या ‘रात और दिन’ या चित्रपटावर आधारित असेल. सत्येन बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रदीप कुमार, नर्गिस आणि फिरोज खान यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, ऐश्वर्याकडून अद्यापपर्यंत या भूमिकेसाठी होकार आलेला नाही. जर ऐशने या भूमिकेला होकार दिल्यास, तिचे चाहते लवकरच तिला एका डार्क थ्रिलरमध्ये बघू शकतील. दरम्यान, ‘रात और दिन’ त्याकाळी बॉक्स आॅफिसवर सुपरहिट चित्रपट ठरला होता. ज्यामध्ये नर्गिस यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले होते. असो, ऐश सध्या तिच्या आगामी ‘फन्ने खान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ऐशच्या होकाराची निर्मात्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. ऐशचा होकार मिळताच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 
Web Title: Aishwarya Rai gets astonishing roll; Sanjay Dutt's mother can play the role!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.