Aishwarya Rai Bachchan's first encounter with husband 'Ax Girlfriend'! | पतीच्या ‘या’ एक्स गर्लफ्रेंडसोबत पहिल्यांदाच झाला ऐश्वर्या राय-बच्चनचा आमना-सामना!

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सध्या तिच्या आगामी ‘फन्ने खां’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अभिनेता अनिल कपूर याच्यासोबत बघावयास मिळणार आहे. यानंतर ती ‘दिन और रात’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर तिचा पती अभिषेक बच्चनला अजूनही चांगल्या स्क्रिप्टची प्रतीक्षा आहे. नुकतेच हे दोघे शाहरूख खानच्या घरी एका पार्टीसाठी पोहोचले होते. शाहरूखनने त्याची मैत्रीण काजल आनंदच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत ऐश-अभिषेक व्यतिरिक्त दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, करिना कपूर-खान, करिश्मा कपूर, हृतिक रोशन, सुजैन खान यांनी हजेरी लावली होती. या पार्टीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ऐश्वर्याच्या पतीची एक्स गर्लफ्रेंड करिश्मा कपूर आणि ती एकाच छताखाली आले होते. 

वास्तविक ऐश्वर्या आणि करिश्माची बॉन्डिंग सुरुवातीपासूनच काही विशेष नाही. अर्थात याचे कारण अभिषेक बच्चन आहे. कारण ऐश्वर्या अगोदर अभिषेक करिश्मा कपूरसोबत लग्न करणार होता. या दोघांचा साखरपुडाही झाला होता. परंतु करिश्माने लग्नानंतर वेगळ्या घरी राहण्याची अट घातली असल्याने हे लग्न होऊ शकले नाही. कारण अभिषेकने करिश्माची ही अट स्पष्ट शब्दात नाकारली होती. पुढे या दोघांमधील नाते तुटले. त्यांच्यात अजूनही कटुता असल्याचे समजते. दरम्यान, ऐशच्या लग्नानंतर या दोघी कधीही समोरासमोर आल्या नाहीत. पहिल्यांदाच त्या या पार्टीच्या निमित्ताने एका छताखाली आल्या होत्या. मात्र दोघींनी एकमेकींना टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पार्टीत अभिषेक आणि ऐश्वर्या आपल्याच धुंदीत होते. या पार्टीत ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चनही उपस्थित होती. त्यामुळे सर्वच ही बाब कटाक्षाने पाळताना दिसले की, त्यांनी एकमेकांसमोर येऊ नये. काही काळ पार्टीत राहिल्यानंतर ऐश आणि अभिषेक निघून गेले. तर करिश्मा तिच्या गर्लगॅँगसोबत व्यस्त होती. दरम्यान, पार्टीत आदित्य रॉय कपूर, फराह खान, फरहान अख्तर, सोनाली बेंद्रे, रविना टंडन, मलाइका अरोरा, अमृता अरोरा, जेनेलिया डिसूझा, संजय कपूर, महीप कपूर, श्वेता बच्चन, सीमा खान हेदेखील उपस्थित होते. 
Web Title: Aishwarya Rai Bachchan's first encounter with husband 'Ax Girlfriend'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.