Aishwarya Rai Bachchan was cast in Mani Ratnam's this film | मणिरत्नम यांच्या 'ह्या' सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनची लागली वर्णी
मणिरत्नम यांच्या 'ह्या' सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनची लागली वर्णी

ठळक मुद्देऐश्वर्या राय बऱ्याच काळानंतर दिसणार दाक्षिणात्य सिनेमात

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत काम करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्या सिनेमात दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मणिरत्नम या सिनेमावर काम करत आहेत. 

ऐश्वर्या राय बऱ्याच काळानंतर दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता विक्रम दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मणिरत्नम, कृष्णमूर्ती कल्कि यांची कादंबरी पोन्नियन सेलवनवर काम करत होते. ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. ही कादंबरी लिहिण्यासाठी कृष्णमूर्ती यांना तीन वर्षांचा कालावधी लागला होता. ऐश्वर्या आणि विक्रमसह या सिनेमात विजय सेतुपति, सिम्बु यांच्यादेखील भूमिका असणार आहेत. 


ऐश्वर्या या सिनेमाशिवाय अनुराग कश्यप निर्मिती गुलाब जामून सिनेमात देखील दिसणार असल्याची शक्यता आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या 'गुलाब जामून' सिनेमात अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी पाहायला मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. सर्वेश मेवाडा हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. याआधी या जोडीने गुरू', 'उमराव जान', 'ढाई अक्षर प्रेम के', 'रावण' व 'सरकार राज' सारख्या सिनेमात स्क्रिन शेअर केली आहे.  गुलाब जामून चित्रपटाच्या निमित्ताने या 'रिअल लाईफ' कपलला 'रिल लाईफ'मध्ये पुन्हा एकदा रोमान्स करताना पाहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या दोघांना इतक्या वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. 


Web Title: Aishwarya Rai Bachchan was cast in Mani Ratnam's this film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.