Aishwarya Rai Bachchan said, 'What is makeup?' | ऐश्वर्या राय-बच्चनने म्हटले, ‘मेकअप करणे म्हणजे...?’

माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने म्हटले की, समाजाने हा पूर्वग्रह दृष्टीकोन बदलायला हवा की, ज्या महिला नटून-थटून बसतात त्यांच्याकडे अजिबातच बुद्धिमत्ता नसते. तसेच हादेखील समज दूर करायला हवा की, ज्या महिला मेकअप करीत नाहीत, त्यांना अजिबातच कुठल्या गोष्टीत रूची नसते. कान्समधून एका व्हिडीओच्या माध्यमातून मीडियाशी बोलताना ऐशने म्हटले की, ‘एक महिला म्हणून आपण एकमेकांवर टीका करणे बंद करायला हवे. जर तुम्ही मेकअप करीत असाल तर याचा अर्थ असा होत नाही की, तुमच्याकडे बुद्धिमता नाही किंवा तुम्ही वास्तविकतेपेक्षा कमी पडता. त्याचबरोबर याचा हादेखील अर्थ होत नाही की, तुम्ही संवेदनशील किंवा दयाळू नाहीत. 

ऐश्वर्याने म्हटले की, ‘जेव्हा तुम्ही मेकअप करीत नाहीत, तेव्हा याचा अर्थ असा होत नाही की, तुम्हाला लोकांमध्ये रूची नाही, किंवा तुमच्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे म्हणून तुम्ही मेकअप करीत नाहीत. दरम्यान, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे हे ऐशचे १७ वे वर्ष आहे. दरवेळीप्रमाणे यावेळेसदेखील ऐश्वर्याने सुंदर दिसण्याची कुठलीच कसर सोडली नव्हती. तिने आपल्या डिझायनर आउटफिट्स, स्टाइल आणि अ‍ॅटिट्यूडने जगभरातील लोकांना इम्प्रेस केले. 
 

दरम्यान, कान्समध्ये तिने पहिल्या दिवशी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. आकाशी रंगाच्या या ड्रेसमध्ये मल्टी-कलर्ड बीड्स आणि सिक्वेन लावलेले होते. या ड्रेसवर तिने Noor Fares ज्वेलरी घातली होती. तर केसांना वेव लूक दिला होता. ऐशच्या या लूकने जगभरातील मीडियाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले होते. जगभरातील मीडियामध्ये ऐशच्या या लूकची एकच चर्चा रंगली होती. 
Web Title: Aishwarya Rai Bachchan said, 'What is makeup?'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.