Aishwarya Rai Bachchan to be seen in the romantic role! Read, the whole news !! | ​ऐश्वर्या राय बच्चनला रोमॅन्टिक भूमिकेत पाहण्यासाठी असा सज्ज! वाचा, संपूर्ण बातमी!!

कान्स फिल्म्स फेस्टिवलमध्ये आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा मोठया पडद्यावर आपला जलवा दाखवण्यास सज्ज झाली आहे. होय, ऐश्वर्या लवकरच दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट साईन करणार असल्याची खबर आहे. मणिरत्नम व ऐश्वर्या या दोघांनी ‘गुरु’ व ‘रावण’ सारखे उत्कृष्ट सिनेमे दिले आहेत. आता ही जोडी पुन्हा एकदा बॉक्सआॅफिसवर धमाका करण्यास तयार आहे.
कान्स फेस्टिवलदरम्यान मीडियाशी बोलताना ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्या चित्रपटाबद्दलचे संकेत दिले होते. मी अलीकडे अनेक चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आहे. यापैकी दोन चित्रपटांची स्क्रिप्ट मला आवडली आहे, असे तिने सांगितले. काही खासगी कारणांमुळे मी चित्रपटांपासून पाच महिन्यांचा ब्रेक घेतला होता आणि मी ब्रेक घेतला, या निर्णयाचा मला आनंद आहे. हा निर्णय माझ्या खासगी आयुष्यासाठी अतिशय गरजेचा होता. या पाच महिन्यांत मी एकही प्रोफेशनल मीटिंग केलेली नाही. गत आठवड्यात मी काही चित्रपटांच्या स्क्रिप्ट ऐकल्या. यापैकी दोन मला आवडल्या. हे चित्रपट मी साईन केलेच तर तुम्हाला नक्की कळेल, असे ऐश्वर्या यावेळी म्हणाली होती.

ALSO READ :  ​कान्समधील ऐश्वर्या, दीपिका व सोनमचे काही candid फोटो!!

ऐश्वर्याला ज्या दोन स्क्रिप्ट आवडल्या, त्यापैकी एक मणिरत्नम यांची आहे. ऐशच्या एका निकटस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसू शकते. हा चित्रपट एक रोमॅन्टिक ड्रामा असेल. हिंदी आणि तामिळ अशा दोन भाषेत तो तयार होईल. दीर्घकाळापासून ऐश्वर्या व मणिरत्नम यांच्यात या चित्रपटांवरून चर्चा सुरु होती. अखेर ही चर्चा यशस्वी झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. याबाबत लवकरच आपल्याला अधिकृत कळेल, अशी अपेक्षा करूयात!

 

 ​


Web Title: Aishwarya Rai Bachchan to be seen in the romantic role! Read, the whole news !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.