Aishwarya likes to travel railway! | आयुषमानला आवडतो रेल्वेचा प्रवास !

 सेलिब्रिटी केवळ चित्रपटात काम करतानाच रेल्वेतून जाताना दिसतात हो ना? वास्तविक आयुष्यात मात्र ते एअरोप्लेनने जाणेच पसंत करतात. पण, तुम्हाला माहितीये का असा एक सेलिब्रिटी आहे ज्याला खºया आयुष्यातही रेल्वेनी प्रवास करायला खुप आवडते.

तो म्हणजे ‘दम लगा के हैशा’ चित्रपटाचा अभिनेता आयुषमान खुराणा. चंदीगढला त्याच्या घरी जाण्यासाठी त्याला प्लेनपेक्षा ट्रेननेच जाणे जास्त आवडते. बरं, आता याचे कारण फार वेगळे आहे. त्याविषयी सांगताना तो म्हणतो,‘ रेल्वेचा प्रवास आवडण्याचे एकमेव कारण हे भूतकाळातील आठवणींशी निगडीत आहे.

माझी आई दिल्लीची होती. म्हणून आम्ही उन्हाळ्यात शताब्दी एक्सप्रेसने जात असू. मला आठवतेय की, त्यावेळी पश्चिम एक्सप्रेस आणि राजधानी एक्सप्रेस या दोन प्रकारच्या ट्रेन्स जात होत्या. तसेच जेव्हा मी थिएटर करत होतो त्यावेळीही चंदीगढ ते मुंबई हा प्रवास रेल्वेतूनच करायचो.’ 
Web Title: Aishwarya likes to travel railway!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.