Aishwarya Khurana, shared experience during the shooting of 'Article 15' | 'आर्टिकल १५'च्या शूटिंगदरम्यान दलदलीत अडकला होता आयुषमान खुराना, शेअर केला अनुभव
'आर्टिकल १५'च्या शूटिंगदरम्यान दलदलीत अडकला होता आयुषमान खुराना, शेअर केला अनुभव


अभिनेता आयुषमान खुराना दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी 'आर्टिकल १५' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या आयुषमानने चित्रपटाच्या सेटवरील एक अनुभव नुकताच शेअर केला आहे.

'आर्टिकल १५'या चित्रपटातील एका दृश्याचे शूटिंग करताना त्याला आलेल्या अडचणी आयुषमान खुरानाने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्याने लिहिले आहे की, 'आजचा दिवस आमच्यासाठी फारच कठीण होता. मात्र या कठीण प्रसंगातही माझ्या सहकाऱ्यांनी माझी साथ दिली. चित्रपटातील एका भागासाठी आम्हाला दलदलीत उतरावे लागले होते. या दलदलीमध्ये असंख्य जळू होते. ज्यामुळे आम्हाला चित्रीकरण करताना अनेक अडचणी आल्या. मात्र माझ्या सहकलाकारांनी या परिस्थितीवर मात केली. विशेष म्हणजे आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आम्हाला मदत केली. आमच्यासाठी मदतीला धावून येणाऱ्या सेटवरील तपास अधिकाऱ्यांचेही मनापासून आभार. तसेच या शूटसाठी माझ्या सहकलाकारांचे आणि चित्रपट दिग्दर्शकांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हासाठी रक्त वाहण्यासाठीदेखील तयार आहे.'


आर्टिकल १५ चित्रपटात आयुषमानसोबत ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्राही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


Web Title: Aishwarya Khurana, shared experience during the shooting of 'Article 15'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.