'AIR' release date for a long time due to flaws? | ​फवादमुळे ‘ऐ दिल’ची रिलीज डेट लांबणीवर?

‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसलेल्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, येत्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार, असे मानले जात असतानाच आता चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडल्याची खबर आहे. ‘ऐ दिल’च्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट रोमान्स पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहोचली होती. साहजिकच चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. पण कदाचित या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागचे खरे कारण पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे, हे आम्ही तुम्हाला सांगायला नकोच. फवादमुळेच हा चित्रपट वांद्यात सापडला आहे. उरी येथे पाकने घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी लादण्याची मागणी होत आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या चित्रपटातून फवादला हाकला अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. या ताज्या वादाचा विपरित परिणाम नको, म्हणून ‘ऐ दिल है मुश्किल’चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे. आता पुढे काय होते ते बघू!!
 
 
Web Title: 'AIR' release date for a long time due to flaws?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.