पुन्हा जरीना वहाबने कंगणावर साधला निशाणा म्हणाली, तिने माझा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिला मुलगी कशी समजू?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 11:25 AM2019-06-14T11:25:42+5:302019-06-14T11:31:56+5:30

२००४ साली कंगणा आणि आदित्य यांचे अफेअर सुरू झाले होते. काही वर्षानंतर त्यांच्यात वाद होत असल्याने दोघेही वेगळे झाले. तोपर्यंत कंगणानेही बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला होता.

Again, Zarina Wahab said to her on the manger, "How did she try to destroy my world, how can she understand her daughter?" | पुन्हा जरीना वहाबने कंगणावर साधला निशाणा म्हणाली, तिने माझा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिला मुलगी कशी समजू?

पुन्हा जरीना वहाबने कंगणावर साधला निशाणा म्हणाली, तिने माझा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिला मुलगी कशी समजू?

googlenewsNext

आदित्य आणि कंगना हे प्रकरण अनेक वर्षांपासून गाजत आहे. कंगणाचे करिअरच्या सुरूवातीला आदित्य पांचोलीसोबत अफेअर होते. इतकेच नाही तर दोघेही बरीच वर्ष लिव्ह इनमध्येही राहिले होते. २००४ साली कंगणा आणि आदित्य यांचे अफेअर सुरू झाले होते. काही वर्षानंतर त्यांच्यात वाद होत असल्याने दोघेही वेगळे झाले. तोपर्यंत कंगणानेही बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला होता.

या दोघांच्या अफेअरमुळे आदित्य पचोलीची पत्नी जरीना वहाबही चर्चेत येत असते. आदित्य पंचोली आणि कंगणा राणौत यांचे अफेअर संपुष्टात येऊन इतके वर्ष उलटले असले तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे दोघे सतत चर्चेत असतात. नुकतेच जरीना वहाबने कंगणावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. जरीनाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, कंगणा माझ्या पती सोबत चार वर्ष नात्यात होती. त्या व्यक्तिला मी मुलगी कशी  समजू.


सिमरन सिनेमावेळी कंगणाने आदित्य पंचोलीवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. मात्र हे सगळे आरोप खोटे असल्याचेही जरीना यांनी म्हटले आहे. आदित्यला सगळ्यात जास्त मी ओळखते. त्यामुळे कंगणाने आदित्यवर लावलेल्या आरोपांवर जराही तथ्य नसल्याचे जरीना सांगितले.  

Web Title: Again, Zarina Wahab said to her on the manger, "How did she try to destroy my world, how can she understand her daughter?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.