२०० कोटींचा ‘भारत’,सलमानसोबत संधी, तरीही का नाराज आहे दिशा पाटनी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 08:00 AM2019-06-21T08:00:00+5:302019-06-21T08:00:02+5:30

दिशा पाटनीचे फिल्मी करिअर सध्या जोरात आहे. ‘बागी 2’च्या जबरदस्त यशानंतर दिशाला ‘भारत’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २०० कोटींची कमाई केलीय.

after working with salman khan in bharat disha patani is upset for this reason | २०० कोटींचा ‘भारत’,सलमानसोबत संधी, तरीही का नाराज आहे दिशा पाटनी?

२०० कोटींचा ‘भारत’,सलमानसोबत संधी, तरीही का नाराज आहे दिशा पाटनी?

googlenewsNext
ठळक मुद्देदिशाने ‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.

दिशा पाटनीचे फिल्मी करिअर सध्या जोरात आहे. ‘बागी 2’च्या जबरदस्त यशानंतर दिशाला ‘भारत’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २०० कोटींची कमाई केलीय. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने १८० कोटींवर मजल मारली. दुस-या आठवड्यात मंगळवारपर्यंत २१ कोटींची कमाई केली. ‘भारत’च्या यशाने भाईजानसह अख्खी स्टारकास्ट खूश आहे. पण दिशा मात्र नाराज आहे. होय, याचे कारण म्हणजे, कतरीना कैफ.

होय, सलमान खानसोबत काम करण्याचे दिशाचे स्वप्न पूर्ण झाले. पण कतरीनासोबत मात्र तिला संधी मिळाली नाही.‘भारत’मध्ये कतरीना असूनही तिच्यासोबत दिशाचा एकही सीन नाही. नेमक्या याचमुळे दिशा काहीसी हिरमुसली आहे. एका मुलाखतीत दिशाने ही खंत बोलून दाखवली. ‘भारत’मध्ये कतरीना होती. पण तिच्यासोबत माझा एकही सीन नव्हता. एकीकडे सलमानसोबत काम करायला मिळतेय म्हणून मी उत्सुक होते. दुसरीकडे कतरीनासोबत एकही सीन मिळू नये, यामुळे मी नाराज होते, असे दिशाने यावेळी सांगितले.

‘भारत’मध्ये दिशाने सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. दिशाने ‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्याआधी ‘लोफर’ या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती.

यानंतर जॅकी चॅनसह ‘कूंग फू योगा’ या सिनेमात ती झळकली होती. पुढे ‘बागी-२’ सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली होती. ‘बागी-२’ मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना भावली होती. तूर्तास दिशा टायगरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसतात.

Web Title: after working with salman khan in bharat disha patani is upset for this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.