After the success of 'Raji', Alia Bhatt got increased, click to learn | 'राजी'च्या यशानंतर आलिया भट्टने वाढवली फिस, जाणून घेण्यासाठी क्लिक करा

सध्या आलिया भट्ट सातवे आसमान पर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही काही दिवसांपूर्वी आलेल्या तिच्या राजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावला आहे. राजीच्या सक्सेसनंतर आलियाने आपल्या फिसमध्ये वाढ केली आहे. 

आलिया राजीच्या आधी एका चित्रपटासाठी 5 कोटींची फिस आकारायची आता आलियाने वाढवून ती 9 कोटी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता जे चित्रपट आलिया साईन करते आहे त्यासाठी तिला 9 कोटी मिळातायेत. गेल्या पाच वर्षांत आलियाने जवळपास 10 चित्रपटांमध्ये काम केले आहेत. त्यातले 9 चित्रपट हिट झाले आहेत. आलियाने वाढवलेल्या फिसच्या मागे तिचा खास मित्र निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याचा हात आहे. आलियाच्या करिअरच्यादृष्टीने राजी हा चित्रपट करिअर पॉईंट ठरला असे म्हटले तर वावगे ठरु नये. आलियाच्या आधी दीपिका पादुकोण, कंगना राणौत, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा आणि करिना कपूर आपल्या फिसला घेऊन चर्चेत राहिल्या आहेत.

ALSO READ :   ‘राजी’ ठरला आलिया भट्टच्या करिअरमधील दुसरा सर्वाम मोठा हिट

‘राजी’ने एका पाठोपाठ एक असे अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.चित्रपट आलियाने सहमत नामाच्या कश्मिरी मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात आलियाने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिका-याची लावून देतात. पाकिस्तानात राहून सहमतला भारतासाठी हेरगिरी करता येईल, एवढाच या लग्नाचा उद्देश असतो. आलियाचे अनेक रूप या चित्रपटात पाहायला मिळताहेत. एक आज्ञाधारी मुलगी, भारताची एक शूर कन्या , एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि एक नीडर गुप्तहेर अशा विविधांगी भूमिकेत ती दिसतेयं. मेघनाचा हा चित्रपट हरिंद सिक्का यांच्या 'कॉलिंग सहमत' या कादंबरीवर आधारित आहे आलियाच्या नवऱ्याची भूमिका विक्की कौशलने साकारली आहे.  
Web Title: After the success of 'Raji', Alia Bhatt got increased, click to learn
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.