After Shahid Kapoor, the actor will keep moving at the actor's house | शाहिद कपूरनंतर 'या' अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणार

शाहिद कपूर नंतर आणखीन एक अभिनेत्याच्या घरी पाळणा हलणार आहे. नील नितिन मुकेश आणि पत्नी रुक्मिणी सहाय यांच्याकडे गुडन्युज आहे. रुक्मिणी सध्या पतीसोबत अबुधाबीमध्ये आहे आणि सप्टेंबरमध्ये नील नितीन मुकेशच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे. सध्या नील नितीन मुकेश अबु धाबीमध्ये शूटिंग करतो आहे, काही महिन्या आधीच आम्हाला रुक्मिणीच्या प्रेग्नेंसीबदल कळले. मात्र ती सगळ्यांना सांगण्यात आम्हाला काही गोष्टी सेटल करायच्या होत्या. सध्या आम्ही बाळासाठी अबु बाधीमध्ये शॉपिंग करतो आहे.  नील आणि रुक्मिणीचे कुटुंबीय बाळाच्या आगमनाला घेऊन खूपच उत्साहित आहेत. नीलने सांगितले की, मम्मी आणि पप्पा खूप चांगले आजी-आजोबा असतील.  गतवर्षी नीलने रूक्मिणी सहायसोबत लग्न केले. नीलचे हे अरेंज मॅरेज आहे. रूक्मिणी ही नीलच्या आई-वडिलांची पसंती आहे. आपल्या दशकाच्या करिअरमध्ये नीलने सुमारे २० चित्रपटांत काम केले. यात  ‘प्लेयर्स’, ‘न्यूयॉर्क’, ‘गोलमान अगेन’, ‘वजीर’, ‘इंदू सरकार’,‘ पे्रम रतन धन पायो’ मुख्य आहेत. 

लवकरच नील अभिनेता प्रभाससोबत ‘साहो’मध्ये दिसणार आहे. नीलसह यात श्रद्धा कपूर, प्रभास, चंकी पांडे आणिजॅकी श्रॉफ यांच्या भूमिका आहेत. ‘साहो’मध्ये स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील. रामोजी फिल्म सिटीत ‘साहो’चे बहुतांश शूटींग झाले. सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही ती दिसणार आहे. प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे.
Web Title: After Shahid Kapoor, the actor will keep moving at the actor's house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.