After Sara Khan, my mother came in tension and then she did something ........ | ​सारा खाननंतर आई अमृताही आली टेंशनमध्ये,त्यानंतर केले असे काही........

आपल्या घरात सुरु असलेला अभिनयाचा वारसा दिग्गज कलाकारांची मुलं मुली पुढे नेत असतात. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मुलं-मुली सिनेमात एंट्री मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान आणि श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर यांच्या डेब्यू सिनेमाची घोषणा झाली असून एकता कपूर निर्मित आणि अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’मधून सारा डेब्यू करतेय. तर जान्हवी कपूर ही करण जोहर निर्मित आणि शशांक खेतान दिग्दिर्शित ‘धडक’मधून डेब्यू करत आहे.शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर जान्हवी कपूरसह सिनेमात झळकणार आहे. या दोघांचे आईवडील सध्या खूप आनंदित आहेत.तर दसुरीकडे सारा खानची आई अमृता सिंह खूप टेंशनमध्ये असल्याचे कळतंय.याला कारणही तसेच आहे सारा आणि जान्हवी दोघीही स्टारकिडस असल्यामुळे दोघींमध्ये तुलनाही सुरु झालीय.डायरेक्टर अभिषेक कपूरचा सिनेमा 'केदारनाथ'मधून सारा डेब्यू करत असली तरीही सारासह आई अमृता सिंहची झोप उडाल्याचे कळतंय.जान्हवी कपूर करत असलेला सिनेमा 'धडक' हा साराच्या डेब्यू सिनेमापेक्षा चांगला तर नाही ना? अशी चिंता माय-लेकींना सतावत आहे.म्हणूनच आई अमृताने थेट  डायरेक्टर अभिषेक कपूरलाच गाठले आणि आपल्या मुलीचा पहिला सिनेमा जान्हवीच्या डेब्यू सिनेमा पेक्षा चांगला व्हावा हेच सांगण्यासाठी अमृता गेली होती,असे बोलले जात आहे. सारा आणि सुशांतचा 'केदारनाथ' सिनेमा 'धडक' पेक्षा सरस ठरणार का? याच चिंतेने आई अमृता आता पुढे आणखी काय करणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 सारा अली खान अन् जान्हवी कपूरची सुरू झाली तुलना! अशी रिअ‍ॅक्ट झाली श्रीदेवी!!

खरे तर,डेब्यूच्या बाबतीत कदाचित सारा जान्हवीपेक्षा एक पाऊल पुढे आहे. कारण साराच्या ‘केदारनाथ’चे शूटींग 'धडक'च्या आधीच सुरु झाले आहे. नुकतेच जान्हवीचा ‘धडक’चे पहिले पोस्टर आले आहे.जान्हवीच्या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर येताच,लोकांनी जान्हवी व सारा या दोघींमध्ये तुलना सुरु केली आहे. केवळ गुणा-रूपावरून नाही तर दोघींपैकी कुणाचा चित्रपट आधी रिलीज होईल, अशी सुद्धा तुलना होत आहे.  सारा व जान्हवीत सुरु असलेल्या या तुलनेबद्दल अलीकडे श्रीदेवीला विचारण्यात आले.त्यावेळी तुलना होणे यात काहीही गैर नाही. एका क्षेत्रात, एकाचवेळी काम करणा-यांमध्ये तुलना होणारच, स्पर्धा असणारच. यात असुया वाटण्याचे कारण नाही. एखादी व्यक्ती तुमची स्पर्धक आहे म्हणून तुम्ही तिला टाळू शकत नाही. ही मनोरंजन इंडस्ट्री आहे आणि अन्य इंडस्ट्रीप्रमाणेच इथेही स्पर्धा आहे.अर्थात या स्पर्धेत टिकायचे तर केवळ आणि केवळ तुमची मेहनत आणि तुमच्यातील प्रतीभा या दोनच गोष्टी कामी येणार आहेत, असे श्रीदेवी यांनी सांगितले होते.श्रीदेवीचे हे वक्तव्य पाहता श्रीदेवी मात्र जान्हवी -सारा या दोघांच्या तुलनेमुळे अमृताप्रमाणे चिंतीत नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.
 
Web Title: After Sara Khan, my mother came in tension and then she did something ........
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.