after sanju rajkumar hirani will make munna bhai 3 with sanjay dutt | फायनल! पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी!!
फायनल! पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी!!

ठळक मुद्दे‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर जोरदार कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटातील संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटातील संजय आणि अर्शदची केमिस्ट्री खूपच गाजली होती.

निर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत. सूत्रांचे मानाल तर राजकुमार हिराणी सध्या ‘मुन्नाभाई’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाईजीच्या तिस-या भागावर काम करत आहेत आणि या चित्रपटात मुन्ना-सर्किट अर्थात संजय दत्त आणि अर्शद वारसी या दोघांचे नाव फायनल करण्यात आले आहे. या दोघांना वगळता चित्रपटातील अन्य स्टारकास्ट नवी असणार आहे.
हिराणी स्क्रिप्टवर सर्वाधिक मेहनत घेतात. ‘मुन्नाभाई’च्या स्क्रिप्टवरही ते मेहनत घेत आहेत.  स्क्रिप्ट तयार आहे आणि २०१९ च्या अखेरपर्यंत या चित्रपटाचे शूटींग सुरू होईल, असे कळतेय. अर्थात या चित्रपटाची कथा काय असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.


‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर जोरदार कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटातील संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटातील संजय आणि अर्शदची केमिस्ट्री खूपच गाजली होती.  
मुन्नाभाई एम.बी.बी.एस या चित्रपटाच्या काही वर्षं आधीच संजय दत्त जेलमधून सुटून आला होता. जेलमधून आल्यानंतर त्याने वास्तव हा सुपरहिट चित्रपट दिला पण ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ हा त्याचा खºया अथार्ने कमबॅक ठरला. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा संजय पाहायला मिळाला. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळालेत. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाच्या यशानंतर ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या काहीच वर्षांत भेटीस आला. ‘लगे रहो मुन्नाभाई’हा चित्रपट हिट ठरल्यानंतर ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ या चित्रपटाची लगेचच घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या पटकथेवर काम देखील झाले होते आणि या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण पुढे या चित्रपटाची कथा दिग्दर्शक-निर्मात्यांना तितकीशी न आवडल्याने या चित्रपटाचे काम रखडले. पण आता लवकरच मुन्नाभाईचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
 

English summary :
Munna Bhai 3: After filming on the life of Sanjay Dutt, Rajkumar Hirani will once again work with Sanjay. Regarding the formulas, Rajkumar Hirani is currently working on the third part of the 'Munnabhai' in which Sanjay Dutt and Arshad Warsi will work togetherly.


Web Title: after sanju rajkumar hirani will make munna bhai 3 with sanjay dutt
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.