After Salman Saif | सैफ पाठोपाठ सलमानलाही पाकी कलाकारांचा पुळका

पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी लादण्याच्या मागणीवरून निर्माण झालेल्या वादात बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान यानेही उडी घेतली आहे. एकंदर काय तर सैफ अली खानच्या पाठोपाठ सलमान खान यालाही पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी लादण्याच्या मागणीवर तुझे काय मत आहे, असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला. यावर सलमानही पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आल्यागत बोलला. ते कलाकार आहेत. दहशतवादी नाहीत, असे सलमान म्हणाला. पाकिस्तानातून भारतात आलेल्या सर्व कलाकारांकडे वैध व्हिसा आहे. आपल्या सरकारने त्यांना देशात काम करण्याची परवानगी दिली आहे, असेही सलमान म्हणाला. यापूर्वी सैफ अली खान पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेताना दिसला होता. आता सैफ पाठोपाठ सलमानही उघड उघडपणे पाकी कलाकारांच्या बाजूने मैदानात उतरलेला दिसला.
Web Title: After Salman Saif
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.