After raising the movie, Rajkumar Rao raised the fees | चित्रपट हिट झाल्यानंतर राजकुमार रावने वाढवली फीस

न्यूटन सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडण्याऱ्या राजकुमार राव याने आपल्या मानधनात वाढ केली आहे. बरेली की बर्फी ट्रैपेड सारखे हिट चित्रपट दिल्यानंतर राजकुमारने आपल्या फिसमध्ये वाढ केली आहे. 

राजकुमार रावने सुरुवातीपासून वेगळ्या थाटणीचे चित्रपट केले. याचा फायदा त्याला आता होताना दिसतोय. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार राजकुमार रावला आता सतत चित्रपटांच्या ऑफर येतायेत. त्याचबरोबर त्यला जाहिरातींच्यादेखील ऑफर येतायेत. 

नुकताच राजकुमारचा 'ओमेर्टा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळाला. ‘ओमेर्टा’ची कथा ब्रिटन येथील कुविख्यात दहशतवादी अहमद ओमर सईद शेख याच्यावर आधारित आहे. राजकुमारने यात अहमद ओमर सईद शेखची भूमिका साकारली आहे. सध्या राजकुमार राव आपला आगामी चित्रपट 'स्त्री'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा  हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत. या चित्रपटाचे लेखन राज आणि डिकेने केले आहे. चित्रपटाची निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत. राज आणि डिके यांनी शोर इन द सिटी, गो गोआ गॉन आणि हॅप्पी एंडिंग सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे.  पहिल्यांदाच राजकुमार श्रद्धासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. यानंतर तो कंगना राणौतसोबत 'मेंटल है क्या' चित्रपटात दिसणार आहे. 'क्वीन'नंतर पुन्हा एकदा राजकुमार राव आणि कंगना राणौत स्क्रिन शेअर करणार आहेत. राजकुमारच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाले तर तो गेल्या अनेक वर्षांपासून पत्रलेखासोबत लिव्ह इन  रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र तूर्तास दोघे लग्न करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 
Web Title: After raising the movie, Rajkumar Rao raised the fees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.