प्रियांकापाठोपाठ परिणीती चोप्राही अडकणार लग्नबंधनात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 10:03 AM2018-12-16T10:03:06+5:302018-12-16T10:04:57+5:30

प्रियांका चोप्रा हिने अलीकडेच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. प्रियांकाच्या लग्नानंतर चोप्रा कुटुंबात आणखी एका लग्नाची तयारी सुरु असल्याचे कळतेय.

after priyanka chopra wedding parineeti chopra will marriage charit desai | प्रियांकापाठोपाठ परिणीती चोप्राही अडकणार लग्नबंधनात?

प्रियांकापाठोपाठ परिणीती चोप्राही अडकणार लग्नबंधनात?

googlenewsNext
ठळक मुद्दे मध्यंतरी परिणीती चोप्रा एका मिस्ट्री मॅनच्या प्रेमात पडल्याची खबर कानावर आली होती.बरेच दिवस परीच्या आयुष्यात  आलेला हा मिस्ट्री मॅन कोण, हे गुलदस्त्यात होते. पण शेवटी या मिस्ट्री मॅनचा चेहरा समोर आला होता. हा मिस्ट्री मॅन दुसरा कुणी नसून करण जोहरचा असिस्

प्रियांका चोप्रा हिने अलीकडेच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. प्रियांकाच्या लग्नानंतर चोप्रा कुटुंबात आणखी एका लग्नाची तयारी सुरु असल्याचे कळतेय. होय, प्रियांकानंतर तिची चुलत बहीण परिणीती चोप्रा लग्न करण्यासाठी तयार असल्याचे मानले जात आहे. कथित बॉयफ्रेन्ड चरित देसाईसोबत ती लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याचे मानले जात आहे.


 मध्यंतरी परिणीती चोप्रा एका मिस्ट्री मॅनच्या प्रेमात पडल्याची खबर कानावर आली होती.बरेच दिवस परीच्या आयुष्यात  आलेला हा मिस्ट्री मॅन कोण, हे गुलदस्त्यात होते. पण शेवटी या मिस्ट्री मॅनचा चेहरा समोर आला होता. हा मिस्ट्री मॅन दुसरा कुणी नसून करण जोहरचा असिस्टंट डायरेक्टर चरित देसाई असल्याचे बोलले गेले होते.
‘ड्रिम टिम टूर’दरम्यान परिणीती आणि चरित या दोघांची ओळख झाली होती. या टूरचे बिहाइंड द सीन्स व्हिडिओ शूट करण्याची जबाबदारी चरितकडे सोपवण्यात आली होती. याचदरम्यान चरित आणि परी यांची मैत्री जमली होती. भारतात परतल्यानंतरही ही मैत्री कायम राहिली आणि पुढे इतकी बहरली की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.   चरित आणि परिणीती हे २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत.  

प्रियांकाने निकसोबत शेअर केलेल्या एका फोटोतही परिणीती आणि चरितची बॉन्डिंग  दिसली होती. त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, परिणीतीने या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. 
काही दिवसांपूर्वी  परिणीतीचा ‘नमस्ते इग्लंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने अर्जुन कपूरसोबत स्क्रिन शेअर केली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. लवकरच परी ‘केसरी’, ‘जबरिया जोडी’ आणि ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटांत दिसणार आहे. 

Web Title: after priyanka chopra wedding parineeti chopra will marriage charit desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.