After Priyanka Chopra, the direction of Salman Khan's 'India' started in Patani | प्रियांका चोप्रानंतर सलमान खानच्या 'भारत'मध्ये दिशा पटानीची लागली वर्णी

नुकताच सलमान खानचा चित्रपट 'रेस3'चा ट्रेलर लाँच झाला आहे. 'रेस3'नंतर त्याच्या फॅन्सना उत्सुकता आहे ती त्याच्या 'भारत' या चित्रपटाची.  अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रानंतर आणखीन एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे ते म्हणजे दिशा पटानीची. दिशा सुद्धा आता या चित्रपटाचा भाग असणार आहे. 'बागी2'ला मिळालेल्या यशनंतर दिशाला सलमान खानसोबत सिल्वर स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे. दिशाच्या आधी या भूमिकेसाठी कॅटरिना कैफचे नाव चर्चेत होते. मात्र आता या भूमिकेसाठी दिशाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार दिशा भारतमध्ये सर्कसमध्ये काम करण्याऱ्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. दिशाबाबत बोलताना अली अब्बास जफर म्हणाला, दिशा या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. आम्ही या भूमिकेसाठी अशा मुलीच्या शोधात होतो जी धाडसी असण्यासोबतच सुंदर असेल. दिशामध्ये हे गुण आहेत.  या चित्रपटाबाबत दिशाचे म्हणणे आहे की, ''मी भारतचा भाग बनून खूश आहे. सलमान खानसोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. मी चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याची वाट बघू शकत नाही. मी अली अब्बास यांची मोठी फॅन आहे.''  

अली अब्बास जफरने सलमानसोबत 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता तो हिट चित्रपटांची हैट्रिक पूर्ण करायच्या तयारीक असले. या चित्रपटाचे शूटिंग दिल्ली, पंजाब, अबु धाबी आणि स्पेनमध्ये होणार आहे. भारतमध्ये सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. 

ALSO READ :  टायगर श्रॉफ अन् दिशा पाटनीचा ‘नकार’ क्रिती सॅनन अन् सुशांत सिंग राजपूतच्या पथ्यावर!!

Web Title: After Priyanka Chopra, the direction of Salman Khan's 'India' started in Patani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.