After 'Pink', Amitabh Bachchan and Tapi Pannu will appear in the director's film | 'पिंक'नंतर 'या' दिग्दर्शकाच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 2016मध्ये आलेल्या शूजीत सरकारच्या 'पिंक' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. यावेळी सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सुनीर खेत्रपाल करणार आहे. हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट असणार आहे. 'बदला' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.   

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाचे शूटिंग जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. एका महिन्याच्या शेड्यूलमध्ये लंडन, स्कॉटलँडमध्ये शूटिंग होणार आहे. तापसी आणि तिच्या बिझनेसमन बॉयफ्रेंडभवती चित्रपटाची कथा फिरणार आहे.  

सुजॉय घोष यांने याआधी 2009मध्ये आलेल्या 'अलादीन'मध्ये बीग बिंसोबत काम केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय रितेश देशमुख आणि जॅकलिन फर्नांडिससुद्धा होते.  
अमिताभ आणि ऋषी कपूर यांच्या जोडीचा ‘१०२ नॉट आउट’ काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाल्यास, बाप-मुलाचे नाते चित्रपटात अतिशय सुरेख पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वडिलांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन असून, मुलाची भूमिका ऋषी कपूर यांनी साकारली आहे. एकीकडे वडील आपले अखेरचे दिवस अतिशय आनंदाने घालवू इच्छितात तर दुसरीकडे मुलगा प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणे टाकणे पसंत करतो. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र झळकले आहेत 
तापसी पन्नूने चष्मे बहाद्दूर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. दक्षिणेत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तापसी बॉलिवूडकडे वळली. चित्रपट आणि मॉडेलिंगच्या जगात यशाच्या शिखरावर पोहोचलेली तापसी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. जुडवानंतर तापसी 'हॉकी पटू संदीप सिंग'च्या आयुष्यावर आधारित चित्रपट दिसणार आहे. लवकरच तापसी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात ती स्वत: एका हॉकी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करतो आहे. 
Web Title: After 'Pink', Amitabh Bachchan and Tapi Pannu will appear in the director's film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.