तेलगू अभिनेत्री श्री रेड्डीचा आणखी एक बॉम्बगोळा! थेट सचिन तेंडुलकरला केले लक्ष्य!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 09:59 AM2018-09-12T09:59:41+5:302018-09-12T10:01:55+5:30

कास्टिंग काऊचच्या मुद्यावरून टॉपलेस होत निषेध नोंदवणारी आणि पुढे तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने आणखी एक बॉम्बगोळा टाकला आहे.

after pawan kalyan and many more sri reddy now targets sachin tendulkar | तेलगू अभिनेत्री श्री रेड्डीचा आणखी एक बॉम्बगोळा! थेट सचिन तेंडुलकरला केले लक्ष्य!!

तेलगू अभिनेत्री श्री रेड्डीचा आणखी एक बॉम्बगोळा! थेट सचिन तेंडुलकरला केले लक्ष्य!!

googlenewsNext

कास्टिंग काऊचच्या मुद्यावरून तेलुगू  हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्स आॅफ कॉमर्स समोर टॉपलेस होत निषेध नोंदवणारी आणि पुढे तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने आणखी एक बॉम्बगोळा टाकला आहे. होय, आत्तापर्यंत पवन कल्याणपासून, सुपरस्टार नानी, टॉलिवूडचा मोठा दबदबा असलेले निर्माते  सुरेश बाबूचा मुलगा अभिराम दग्गुबती अशा अनेकांवर श्री रेड्डीने कास्टिंग काऊचचे आरोप ठेवलेत. यानंतर तेलगू इंडस्ट्रीत जणू वादळ आले़ आता तिने पुन्हा एकदा एका व्यक्तिला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. पण यावर विश्वास ठेवणे बरेच कठीण आहे.
होय, श्री रेड्डीने आता क्रिकेटचा देव मानला जाणा-या सचिन तेंडुलकरसोबतच्या लिंकअपसंदर्भात हिंट देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सचिन तेंडुलकरला थेट लक्ष्य करत, एक पोस्ट लिहिली. 

‘एक रोमॅन्टिक पुरूष, ज्याला लोक सचिन तेंडुलकरण म्हणून ओळखतात, हैदाराबादेत आला असता एका ‘चार्मिंग गर्ल’ने त्याच्यासोबत रोमान्स केला. महान व्यक्ती चांगला खेळ खेळू शकतात. माझा अर्थ चांगला रोमान्स करू शकतात, असा आहे, ’ असे श्री रेड्डीने लिहिले आहे. श्रीने आपल्या पोस्टमध्ये ज्या ‘चार्मिंग गर्ल’चा उल्लेख केलायं, ती तेलगू अभिनेत्री चार्मी कौर असल्याचे मानले जात आहे. आता श्रीच्या आरोपावर सचिन तेंडुलकर किंवा स्वत: चार्मी कौर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
श्री रेड्डीने मधल्याकाळात अनेक गौप्यस्फोट केलेत. सुरूवातीला बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनीही तिला पाठींबा दिला होता. टॉपलेस होऊन निदर्शने करणा-या तिच्या कृतीची खुद्द राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली होती. आता श्री रेड्डीने पुन्हा एक गौप्सस्फोट केला आहे. अर्थात सचिनचे चाहते, तिचा हा आरोप किती पचवू शकतील, ही शंकाचं आहे.

Web Title: after pawan kalyan and many more sri reddy now targets sachin tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.