प्रियांका-निकच्या लग्नाच्या महिनाभरानंतर आऊट झाले 'हे' फोटो आणि व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 11:08 AM2019-01-04T11:08:20+5:302019-01-04T11:17:49+5:30

प्रियांकाच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले

After a month of Priyanka-Nick's wedding, 'This' photos and videos are out | प्रियांका-निकच्या लग्नाच्या महिनाभरानंतर आऊट झाले 'हे' फोटो आणि व्हिडीओ

प्रियांका-निकच्या लग्नाच्या महिनाभरानंतर आऊट झाले 'हे' फोटो आणि व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियांकाच्या लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओसमोर आले आहेतमुंबईत रिसेप्शन दिल्यानंतर प्रियांका लंडनला गेली

डिसेंबर महिन्यात  प्रियांका चोप्रा आणि निक जोनास विवाह बंधनात अडकले. प्रियांकाच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले. त्यानंतर प्रियांका दिल्लीत आणि मुंबईत दोन रिसेप्शन दिलेत.


आता प्रियांकाच्या लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओसमोर आले आहेत.  हे फोटो याआधी तुम्ही पाहिलेली नसतील. या फोटो आणि व्हिडीओमध्ये प्रियांका लंहग्यात आणि गाउन दोन्ही ड्रेससमध्ये दिसते आहे. सध्या प्रियांका आणि निक स्वित्झर्लंडमध्ये आहेत. मुंबईत रिसेप्शन दिल्यानंतर प्रियांका लंडनला गेली. ख्रिसमस आणि न्यू इअरचे सेलिब्रेशन तिने फॅमिलीसोबत केले. 


निक एक हॉलिवूड सिंगर आहे आणि प्रियांकाने अनेक हॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. लग्नापूर्वी प्रियांकाने बॉलिवूडचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट हातावेगळा केला. या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. लग्नानंतर प्रियांका पुन्हा एकदा अभिनयाकडे वळणार आहे आणि भन्साळींसारख्या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे.

साहजिकच, आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या यापूर्वी ह्यसात खून मारहण या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.

Web Title: After a month of Priyanka-Nick's wedding, 'This' photos and videos are out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.