After a month of marriage, Neha Dhupia's 'This' photo was romantic romantic! | लग्नाच्या एक महिन्यानंतर नेहा धूपियाचा ‘हा’ फोटो बघून पती अंगद झाला रोमॅण्टिक !

अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. या दाम्पत्याने दिल्लीतील एका गुरुद्वारात गुपचूप लग्न केले होते. त्यानंतर नेहाने लग्नाची बातमी तिच्या चाहत्यांशी शेअर केली होती. लग्नाला एक महिना पूर्ण होताच नेहा आणि अंगद बेदीने एक फोटो शेअर केला. हा फोटोमध्ये दोघांचा रोमॅण्टिक अंदाज बघावयास मिळत असून, त्यास चाहत्यांकडून तुफान पसंत केले जात आहे. नेहा आणि अंगद बºयाच काळापासून एकमेकांना डेट करीत होते. त्यानंतर अचानकच दोघांनी लग्न केले अन् त्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली. नेहा-अंगद गेल्या १० मे रोजी लग्नाच्या बंधनात अडकले होते. 
 

दरम्यान, लग्नाला एक महिना पूर्ण होताच नेहा आणि अंगदने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला. मेहंदी सेरेमनीचा हा फोटो असून, त्यात दोघेही खूपच रोमॅण्टिक अंदाजात दिसत आहेत. फोटोमध्ये अंगद नेहाला आपल्या कवेत घेताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना नेहाने लिहिले की, ‘लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. अजून तर बराच काळ एकत्र राहायचे आहे. नेहाच्या या पोस्टनंतर अंगदनेही नेहासोबतचा एक फोटो पोस्ट केला. हा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटो शेअर करताना अंगदने लिहिले की, लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. एवढे नक्कीच सांगू शकतो की, नेहा तुझी टेस्ट खूपच चांगली आहे. 
 

दरम्यान, लग्नाच्या रात्रीच अंगद आणि नेहा विमानतळावर स्पॉट झाले होते. त्यावेळी असे म्हटले जात होते की, नेहा आणि अंगद हनिमूनसाठी अमेरिकेला रवाना झाले होते. त्यानंतर नेहाने सोशल मीडियावर याबाबतचा खुलासा करताना सांगितले होते की, आम्ही हनिमूनला नव्हे तर कामानिमित्त आलो आहोत. 
Web Title: After a month of marriage, Neha Dhupia's 'This' photo was romantic romantic!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.