अन् ‘सिंघम’ची ही हिरोईन मोदींच्या शपथविधी सोहळ्याला मुकली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 11:45 AM2019-05-31T11:45:37+5:302019-05-31T11:47:09+5:30

राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात नरेंद्र मोदी यांचा भव्यदिव्य शपथविधी समारंभ पार पडला. या समारंभात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. पण ‘सिंघम’ची ही हिरोईन मात्र निमंत्रण मिळूनही या समारंभात हजर राहू शकली नाही.

after missing narendra modi oath ceremony kajal aggarwal shares heartfelt note | अन् ‘सिंघम’ची ही हिरोईन मोदींच्या शपथविधी सोहळ्याला मुकली!!

अन् ‘सिंघम’ची ही हिरोईन मोदींच्या शपथविधी सोहळ्याला मुकली!!

googlenewsNext
ठळक मुद्देकाजल अग्रवालच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या ‘सीता’ या तेलगू चित्रपटात बिझी आहे.

गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात नरेंद्र मोदी यांचा भव्यदिव्य शपथविधी समारंभ पार पडला. सुमारे साडेसहा हजार मान्यवरांच्या साक्षीने पार पडलेल्या या समारंभात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली.  निमंत्रण मिळालेल्या जवळपास प्रत्येकाने या समारंभास हजेरी लावली. पण अभिनेत्री काजल अग्रवाल ही मात्र निमंत्रण मिळूनही या समारंभात हजर राहू शकली नाही. याचे दु:ख काजलने बोलून दाखवले.
इन्स्टाग्रामवर मोदींच्या शपथविधी समारंभाची निमंत्रण पत्रिका शेअर करत तिने याबद्दल दु:ख व्यक्त केले.

‘शपथविधी समारंभास मला निमंत्रित केल्याबद्दल मनापासून आभार. हे निमंत्रण माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या क्षणांचे साक्षीदार झाली असती तर आनंद झाला असता. पण मला निमंत्रण उशीरा मिळाले. त्यामुळे मी वेळेत दिल्लीला पोहोचू शकले नाही, याचे दु:ख वाटतेय,’असे काजलने लिहिले. या पोस्टमध्ये तिने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही टॅग केले.


मोदींच्या शपथविधी समारंभास देशातील उद्योगपती मुकेश अंबानी, रतन टाटा आदी हजर होते. फिल्मी दुनियेतील अनेक स्टार्सची उपस्थितीही आकर्षणाचे केंद्र होती. अनुपम खेर, आशा भोसले, अनिल कपूर, करण जोहर, कंगना राणौत, राजकुमार हिरानी, शाहिद कपूर असे अनेकजण या समारंभास हजर होते.


काजल अग्रवालच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या ‘सीता’ या तेलगू चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात ती अभिनेता श्रीनिवाससोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. एका यशस्वी बिझनेसवूमनची भूमिका ती साकारतेय. याशिवाय कमल हासन यांच्या ‘इंडियन 2’ या सिनेमातही ती झळकणार आहे.

Web Title: after missing narendra modi oath ceremony kajal aggarwal shares heartfelt note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.