‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ नंतर बालाकोट एअर स्ट्राईकवरही बनणार चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:16 PM2019-03-04T13:16:05+5:302019-03-04T13:19:06+5:30

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’च्या या यशानंतर आता बालाकोट एअर स्ट्राईकवर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.

after film uri success abhishek kapoor will make the film on air strike and abhinandan | ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ नंतर बालाकोट एअर स्ट्राईकवरही बनणार चित्रपट?

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ नंतर बालाकोट एअर स्ट्राईकवरही बनणार चित्रपट?

ठळक मुद्देचर्चा खरी मानाल तर संजय लीला भन्साळी, भूषण कुमार आणि महावीर कपूर हे हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. तर ‘केदारनाथ’चे दिग्दर्शक अभिषेक कपूर हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

सर्जिकल स्ट्राईकवर बनलेला ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर प्रचंड गाजला. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याचेही प्रचंड कौतुक झाले. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’च्या या यशानंतर आता बालाकोट एअर स्ट्राईकवर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.
गत १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर  भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या  लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुज्झफराबादमधील  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हवाई दलाच्या याच कारवाईवर चित्रपट बनवण्याची तयारी बॉलिवूडने चालवली आहे. 


चर्चा खरी मानाल तर संजय लीला भन्साळी, भूषण कुमार आणि महावीर कपूर हे हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. तर ‘केदारनाथ’चे दिग्दर्शक अभिषेक कपूर हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाच्या रिसर्चचे काम सुरु झाल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे, याच वर्षांत या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, अशी शक्यता आहे. बालाकोट, पुलवामा- द डेडली अटॅक, सर्जिकल स्ट्राईक 2.0, हिंदुस्तान हमारा है, हाऊज द जोश असे अनेक टायटल मोशल पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशनकडे रजिस्टर करण्यासाठी पाठवण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव यापैकी एक असेल.
या चित्रपटाची स्टारकास्ट अद्याप ठरलेली नाही. पण अनेक बडे स्टार्स या चित्रपटात काम करण्यास उत्सूक असल्याचे कळतेय. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची भारत वापसीही या चित्रपटात दाखवली जाणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील कमाईचा बहुतांश भाग हा आर्म्ड फोर्सेस वेलफेअर फंडला दिला जाईल, असेही कळतेय.

Web Title: after film uri success abhishek kapoor will make the film on air strike and abhinandan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.