After the depression, did Kapil Sharma's girlfriend go with a breakup? | डिप्रेशनमध्ये गेल्या नंतर कपिल शर्माचे आपल्या गर्लफ्रेंडसोबत झाले ब्रेकअप ?

नुकताच कपिल शर्माने आपला दुसरा चित्रपट 'फिरंगी' चा ट्रेलर रिलीज केला. कपिल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेच पण तो या चित्रपटाचा निर्माता देखील आहे. या चित्रपटासाठी तो दिवस रात्र एक करुन प्रचंड मेहनत घेत आहे. ट्रेलर लाँचच्या दरम्यान कपिलने सांगितले की या चित्रपटाचा ट्रेलर तो सुनील ग्रोव्हरच्या हस्ते लाँच करणार होता पण सुनील ग्रोव्हर सध्या कॅनडामध्ये आहे त्यामुळे तो ट्रेलर लाँचच्या वेळेस येऊ शकला नाही. त्याचबरोबर दुसरीकडे अशी बातमी आहे की कपिलने आपल्या गर्लफ्रेंड  गिन्नींशी  साखरपुडा मोडला आहे.

काही महिन्यांपूर्वी कपिलने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या गर्लफ्रेंडची ओळख सगळ्यांना करुन दिली होती. कपिलने  म्हटले होते की,  ती त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि तो तिच्या शिवाय जगू शकत नाही. वर्षाअखेरिस कपलिने  गिन्नीसोबत लग्न करणार असल्याचे  म्हटले होते. पण कदाचित आता कपिल व गिन्नीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

पण आता असे वाटते आहे की त्यांचे हे नाते संपुष्टात आले आहे. फिरंगी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळेस कपिल शर्माला त्याच्या ब्रेकअपबाबत विचारण्यात आले. यावेळी तो म्हणाला प्रश्न चांगला आहे पण मी यावर उत्तर देऊ इच्छित नाही. 

ALSO RAED : कपिल शर्माने ऐकवला सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणाचा वेगळाच किस्सा; म्हणे, भांडण झालेच नाही!

कपिल शर्मा आपल्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळेस थोडा बदलेला दिसून आला, सुनील ग्रोव्हर बरोबर झालेल्या भांडणानंतर शोची टीआरपी ढसळली आणि कपिल डिप्रेशनमध्ये गेला होता. यातून बाहेर येण्यासाठी तो काही महिने बंगळुरुमध्ये उपचार देखील घेत होता.  आता तो पूर्णपणे बरा होऊन या चित्रपटाच्या माध्यनातून कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला या चित्रपटाकडून फारच अपेक्षा आहेत हे चित्रपट २४ नोव्हेंबर ला रिलीज होणार आहे. तसेच  ‘बॉम्बे टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, कपिलच्या शोच्या सेटवरच ‘आदत से मजबूर’चे काही भाग शूट केले गेले आहेत. तो सुट्टीवर जाण्यापूर्वीच या भागांचे शूटींग झाले होते. या शोच्या काही भागांमध्ये कपिल झळकणार आहे. अर्थात  हा शो कधीपासून सुरू होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Web Title: After the depression, did Kapil Sharma's girlfriend go with a breakup?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.