After the dashing story of Salman Khan, Jacqueline Fernandez did the same! | सलमान खानच्या डॅशिंग अंदाजानंतर जॅकलीन फर्नांडिसनेही केली हवा!

सुपरस्टार सलमान खानचा आगामी ‘रेस-३’मधील फर्स्ट लूक गेल्या सोमवारीच समोर आला होता. यामध्ये सलमान खान खूपच डॅशिंग अंदाजात बघावयास मिळत होता. आता अशीच काहीशी हवा जॅकलीन फर्नांडिसनेही केली आहे. ‘रेस-३’मधील जॅकलीनचा फर्स्ट लूक समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच डॅशिंग आणि बोल्ड लूकमध्ये बघावयास मिळत आहे. फर्स्ट लूकमध्ये जॅकलीनने हातात गन पकडली आहे. काळ्या रंगाच्या व्ही शेप टॉपमध्ये जॅकलीन खूपच स्मार्ट दिसत आहे. जॅकलीनने पोस्टरमध्ये हाफ क्लच केंसाची हेअरस्टाइल केली आहे. सलमानने स्वत:च जॅकलीनचा फर्स्ट लूक फोटो त्याच्या ट्विटरवरून शेअर केला आहे. त्याचबरोबर जॅकलीनच्या कॅरेक्टरचे चित्रपटात काय नाव असेल याचाही त्याने उलगडा केला आहे. सलमानने पोस्टर शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जैसिका : रॉ पावर’ जॅकलीननेही हे पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. त्याचबरोबर कॅप्शन देताना लिहिले की, ‘...आणि पावर खूपच डेंजरस होऊ शकते. रेस-३ या ईदला’
 

या अगोदर ‘रेस-३’मधील सलमान खानचा फर्स्ट लूक समोर आला होता. ज्यामध्ये सलमान खूपच हॅण्डसम दिसत होता. सलमाननेदेखील पोस्टरमध्ये त्याच्या हातात गन पकडली होती. सलमानने या अगोदर आपल्या चित्रपटाचा टिजर ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. दरम्यान, प्रेक्षकांना सलमान आणि जॅकलीनचा फर्स्ट लूक खूपच आवडत असल्याचे दिसून येत आहे. सलमानच्या फर्स्ट लूक पोस्टरला त्याच्या चाहत्यांनी अनेक कॉमेण्ट्स दिल्या. त्याचबरोबर चित्रपटासाठी आम्ही एक्साइटमेंट असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. असाच काहीसा प्रतिसाद जॅकलीनच्या लूकला चाहत्यांकडून मिळत आहे. जॅकलीनच्या एका इन्स्टाग्राम यूजरने लिहिले की, ‘चित्रपट हिट आहे’ दुसºया एका यूजरने लिहिले ‘रेस-३ साठी आम्ही खूपच एक्साइटेड आहोत’ आणखी एका चाहत्याने लिहिले ‘चित्रपटाची मला खूपच प्रतीक्षा लागली आहे. मी वेट करू शकत नाही.’ चाहत्यांच्या या प्रतिक्रिया पाहता चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. दरम्यान, हा चित्रपट ईदनिमित्त प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सलमान-जॅकलीन व्यतिरिक्त बॉबी देओल, देजी शाह आणि अनिल कपूरच्या प्रमुख भूमिका आहेत. 
Web Title: After the dashing story of Salman Khan, Jacqueline Fernandez did the same!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.