सोनाक्षी सिन्हाला भेटला ‘स्वप्नातला राजकुमार’? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 11:28 AM2018-12-12T11:28:11+5:302018-12-12T11:29:00+5:30

होय, ताजी खबर मानाल तर सोनाक्षी सिन्हाला तिच्या स्वप्नातला राजकुमार सापडला आहे.

after breaking up with bunty sachdeva sonakshi sinha start dating notebook actor zaheer iqbal | सोनाक्षी सिन्हाला भेटला ‘स्वप्नातला राजकुमार’? 

सोनाक्षी सिन्हाला भेटला ‘स्वप्नातला राजकुमार’? 

googlenewsNext
ठळक मुद्देजहीर इक्बाल हा सलमानच्या मित्राचा मुलगा आहे. सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून जहीर बॉलिवूड डेब्यू करतोय.  मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन ही सुद्धा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. पण तूर्तास जहीरच्या डेब्यू चित्रपटापेक्षा सोनाक्षीसोबत त्याच

बॉलिवूड इंडस्ट्रीत दोन सिंगल कलाकार एकत्र पार्टी इन्जॉय करताना दिसलेच तर त्याचा अर्थ काय होतो, हे आपण सगळेच जाणतो. ज्यांची लव्हस्टोरी पार्टीत सुरू झाली, अशी अनेक जोडपी बॉलिवूडमध्ये आहेत. तूर्तास या यादीत आणखी एका कपलचे नाव चढण्याची शक्यता दिसतेय. होय, ताजी खबर मानाल तर सोनाक्षी सिन्हाला तिच्या स्वप्नातला राजकुमार सापडला आहे. अलीकडे अभिनेता जहीर इक्बालने आपल्या वाढदिवसाची पार्टी दिली.

मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये रंगलेल्या या पार्टीत सलमान खान, आयुष शर्मा, सूरज पांचोली, प्रनूतन बहल यांच्यासारखे अनेक जण पोहोचले. सोनाक्षीही या पार्टीत होती आणि प्रत्यक्षदर्शीचे मानाल तर सोना व जहीर यांची पार्टीतील केमिस्ट्री बरेच काही सांगणारी होती. दोघांनीही पार्टीत बराच वेळ एकत्र घालवला. यावेळी त्यांची जवळीक सगळ्यांनीच बघितली. डान्स फ्लोरवर तर दोघांनी आग लावली. आपल्या आजुबाजुला कोण आहे, हे विसरून दोघांनीही या पार्टीत म्हणे धम्माल मस्ती केली.


जहीर इक्बाल हा सलमानच्या मित्राचा मुलगा आहे. सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून जहीर बॉलिवूड डेब्यू करतोय.  मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन ही सुद्धा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. पण तूर्तास जहीरच्या डेब्यू चित्रपटापेक्षा सोनाक्षीसोबत त्याच्या वाढलेल्या मैत्रीची चर्चा सुरु आहे.


सोनाक्षी आधी बंटी सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण याचवर्षी फेब्रुवारीत दोघांचेही ब्रेकअप झाले. खरे तर दोघांचेही रिलेशन लग्नापर्यंत पोहोचणार असे मानले जात होते. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची खबर आली. बंटीनंतर सोनाच्या आयुष्यात जहीरने एन्ट्री घेतली आहे. आता हे नाते कुठल्या वळणावर जाते, ते बघूच.

Web Title: after breaking up with bunty sachdeva sonakshi sinha start dating notebook actor zaheer iqbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.