Shocking : विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली हरलीन सेठी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:41 PM2019-04-16T16:41:12+5:302019-04-16T16:53:16+5:30

विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफला घेऊन चर्चेत आहे. एक मुलाखती दरम्यान विकीने इशारो-इशारोमध्ये लेडी लव्ह हरलीन सेठीवरील प्रेमाची कबुली दिली होती.

After break up from vicky kaushal ex girlfriend harleen sethi is fighting with depression | Shocking : विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली हरलीन सेठी!

Shocking : विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली हरलीन सेठी!

googlenewsNext
ठळक मुद्देविकीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हरलीन डिप्रेशनमध्ये गेली आहे रिपोर्टनुसार हरलीन लवकरच डिप्रेशनमधून बाहेर येईल

विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफला घेऊन चर्चेत आहे. एक मुलाखती दरम्यान विकीने इशारो-इशारोमध्ये लेडी लव्ह हरलीन सेठीवरील प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली. आता हरलीन संबंधी आणखी एक गोष्ट समोर येते आहे. 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार विकीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हरलीन डिप्रेशनमध्ये गेली आहे. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी हरलीन कुटुंबीयांसोबत जास्ती जास्त वेळ घालवतेय. रिपोर्टनुसार हरलीन लवकरच डिप्रेशनमधून बाहेर येईल. कॅटरिना कैफसोबत विकीच्या वाढत्या जवळीकीमुळे हरलीन दुखावली आणि तिने विकीसोबत ब्रेकअप केले. तेव्हापासून कॅट व विकी यांच्या ऑफस्क्रिन रोमान्सच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चेत किती तथ्य आहे, हे तर आम्हाला ठाऊक नाही.

तर दुसरीकडे विकीचे नाव भूमी पेडणेकरसोबत सुद्धा जोडण्यात आले. विकी आणि भूमी पेडणेकरची वाढती जवळीक हरलीनला विकीपासून दूर घेऊन गेली. करण जोहरने 'तख्त'मध्ये विकी आणि भूमीला साईन केले आहे. याशिवाय दोघे आणखी एक हॉरर सिनेमात एकत्र दिसणार आहे. 

विकीच्या कामाबद्दल बोलायचे तर लवकरच विकी धर्मा प्रॉडक्शनच्या ‘तख्त’मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय त्याची वर्णी आदित्य धरच्या आणखी एक सिनेमात लागली आहे. 
 

Web Title: After break up from vicky kaushal ex girlfriend harleen sethi is fighting with depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.