After all, she spoke about 'that' photo of Mahima Chaudhary; The divorce with the husband expressed sadness! | अखेर ‘त्या’ फोटोबद्दल बोलली महिमा चौधरी; पतीसोबत घेतलेल्या घटस्फोटाचे दु:खही केले व्यक्त!

१९९७ मध्ये शाहरूख खानच्या ‘परदेश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री महिमा चौधरी सध्या भलतीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे फोटो व्हायरल होत असल्याने हीच का ती महिमा चौधरी? असा प्रश्न तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. महिमाने ‘परदेश’नंतर ‘दाग : द फायर, प्यार कोई खेल नही, धडकन, दीवाने, कुरुक्षेत्र, ओम जय जगदीश, दिल है तुम्हारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती पडद्यावरून गायब झाली आहे. परंतु तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

खरं तर महिमाने कमबॅक करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. चाहत्यांच्या याच प्रश्नांना उत्तर देताना मिड डेशी बोलताना महिमाने सांगितले की, ‘इंडस्ट्री वरिष्ठ अभिनेत्रींना चांगल्या भूमिका देत नाही. त्यांच्यासाठी चांगल्या भूमिका लिहिल्या जात नाहीत. त्यामुळेच मी इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.’ महिमाने पुढे बोलताना म्हटले की, ‘सामान्य भूमिका साकारण्यापेक्षा काही न केलेले बरे असा विचार मी करते.’ यावेळी महिमाने पती बॉबी मुखर्जीसोबत झालेल्या घटस्फोटाविषयी सांगितले. तिने म्हटले की, ‘जेव्हा मला माझे नवे प्रेम मिळणार तेव्हा मी घटस्फोटाची औपचारिकता पूर्ण करणार’.आपल्या व्हायरल होत असलेल्या फोटोंबद्दल महिमाने सांगितले की, ‘मी एक सिंगल मदर होती आणि मला पैसे कमवायचे होते. एक मुलगा असताना चित्रपटात काम करणे खूप अवघड होते. कारण याकरिता पुष्कळ वेळ हवा असतो. त्यामुळेच मी शो जज करणे, फंक्शनमध्ये जाणे किंवा रिबिन कापण्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यास सुरुवात केली. कारण हे सर्व माझ्यासाठी खूपच सोपे होते. मात्र आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला असे वाटते की, त्या सर्व गोष्टींमुळे एक अभिनेत्री म्हणून माझ्यावर विपरीत परिणाम झाला. 
Web Title: After all, she spoke about 'that' photo of Mahima Chaudhary; The divorce with the husband expressed sadness!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.