After the acting, Siddharth Malhotra will make his debut in 'Theater'! | अभिनयानंतर सिद्धार्थ मल्होत्रा 'या' क्षेत्रात करणार पदार्पण!

सिद्धार्थ मल्होत्राने आपला आगामी चित्रपट ए जेंटलमॅनमध्ये 'बंदूक मेरी लैला' या गाण्यातून बॉलिवूडमध्ये रॅपर म्हणून पदार्पण केले आहे. हे गाण सिद्धार्थ आणि रफ्तारने मिळून गायले आहे. या गाण्याला सचिन-जिगर यांच्या जोडीने संगीत दिले आहे. या गाण्याबाबत बोलताना सचिन-जिगर म्हणाले, '' हे नव्या पिढीचे आर एंड बी साँग आहे. बॉलिवूडमध्ये अशा प्रकारचे पहिले रॅप साँग आहे. सिद्धार्थच्या भूमिकेला हे गाणं सूट करते आहे. आधी आम्हाला वाटले नव्हते हे गाणं आम्ही तयार करु शकू मात्र गाणं जस- जसे पूर्ण व्हायला लागले त्याला मिळाणार पोझिटिव्ह प्रतिसाद बघून आम्ही गाणं पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तसेच या गाण्यात सिद्धार्थकडून रॅप करण्याचा निर्णय यासाठी घेण्यात आला कारण त्याला हिप हॉप आणि रॅपमधले बऱ्यापैकी समजते.''  


ALSO READ : watch : ​-अन् पोल डान्स करताना जखमी झाली जॅकलिन फर्नांडिस!

ए जेंटलमॅन’मध्ये सिद्धार्थ आणि जॅकलिन फर्नांडिसची जोडी दिसणार आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांनी आधीचे डोक्यावर घेतली आहेत. या आधी रिलीज झालेली गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसली आहेत. जॅकलिन आणि सिद्धार्थची हॉट केमिस्ट्री प्रत्येक गाण्यातून दिसते आहे. यात सिद्धार्थ डबल रोलमध्ये दिसणार आहे. गौरव आणि ऋषी नावाच्या तरुणाची भूमिका तो साकारतो आहे. तर जॅकलिन काव्या नावाच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. अ‍ॅक्शन व कॉमेडीची भरमार असलेला राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित हा चित्रपट ऑगस्टअखेरिस रिलीज होणार आहे. जॅकलिन आणि सिद्धार्थशिवाय यात सुनील शेट्टीची ही महत्त्वाची भूमिका आहे. मायामीला या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. 
Web Title: After the acting, Siddharth Malhotra will make his debut in 'Theater'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.