After acting Nawazuddin Siddiqui turned to singing | ​अभिनयानंतर नवाझुद्दीन सिद्दीकी वळला गायनाकडे

नवाझुद्दीने सिद्दीकीने किक, लंचबॉक्स, तलाश, गँगस ऑफ वासेपूर, कहानी, बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. आज नवाझुद्दीनचा बॉलिवूडमधील दर्जेदार कलाकारांमध्ये समावेश होतो. पण त्याचा हा प्रवास काही सोपा नव्हता. एका छोट्याशा गावातून आलेल्या नवाझुद्दीनने त्याच्या कारकिर्दीत प्रचंड स्ट्रगल केला आहे. त्याने मुन्नाभाई एमबीबीएस, सरफरोश या चित्रपटांमध्ये खूपच छोट्या भूमिका साकारल्या आहेत. पण आज त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. अभिनयक्षेत्रात यश मिळाल्यानंतर आता नवाझुद्दीन गायनाकडे वळला आहे. 
नवाझुद्दीन आता गायक बनला असून एका गीतासाठी त्याने त्याचा आवाजदेखील दिला आहे. भारतात लवकरच रिव्हर रॅली होणार असून त्याच्यासाठी एक अँथेम साँग बनवण्यात आले आहे. या अँथेम साँगचे म्युझिक संगीत दिग्दर्शक सचिन गुप्ताने दिले आहे. सचिननेच या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणे अनेक सेलिब्रिटी एकत्र मिळून गाणार आहेत. नवाझुद्दीन सिद्दीकीने हे गाणे गायले असून त्याच्यासाठी गायनाचा हा पहिलाच अनुभव आहे. गायनाचा त्याचा हा अनुभव खूपच चांगला असल्याचे कळतेय. त्याच्यासोबतच हे गाणे गायक शान, सोनल चौहान, मनिष पॉल, दर्शन रावळ, सोनू कक्कर, रितुराज मोहोन्ती यांनी मिळून गायले आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या गीताला त्यांचा आवाज दिला आहे. तसेच त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील हे गाणे गायले आहे. 
सचिन आणि दर्शन रावळ यांनी गायलेले एक सिंगल नुकतेच रसिकांच्या भेटीस आले असून त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Also Read : या कारणामुळे सलमान खान नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या पार्टीत
Web Title: After acting Nawazuddin Siddiqui turned to singing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.