After 30 years on the silver screen, it will be seen again from Doom to Qayamat, Raj-Rashmi's Love Story as Aamir-Juhi Rasika | रुपेरी पडद्यावर ३० वर्षांनी पुन्हा झळकणार कयामत से कयामत तक, राज-रश्मीची लव्हस्टोरी आमिर-जुही रसिक म्हणून अनुभवणार

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने रुपेरी पडद्यावर विविधरंगी भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली.कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यासाठी जीव ओतून अभिनय करणारा अभिनेता अशी आमिरची ओळख.एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कितीही प्रयोग करावे लागले तरी आमिरने मागे पुढे पाहिलं नाही. त्यामुळे प्रत्येक भूमिकेत समरस होऊन जाणारा अभिनेता अशी ओळख आमिरने रसिकांच्या मनात निर्माण केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून आमिरला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ३० वर्षात आमिरने विविध सिनेमांमधून वैविध्यपूर्ण आणि एकाहून एक सरस भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन केले. दंगल, पीके, थ्री इडियट्स, तारें जमीं पर, लगान अशा कितीतरी सिनेमांत आमिरने दर्जेदार भूमिका साकारुन बॉलीवुडवर अधिराज्य गाजवलं आहे. आमिरच्या दर्जेदार सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे कयामत से कयामत तक. १९८८ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या कयामत से कयामत तक या सिनेमातून आमिर आणि जुही चावला झळकले होते. या सिनेमातील भूमिकेने या दोन्ही कलाकारांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. ही जोडी रसिकांच्या मनात घर करुन गेली. या सिनेमाने त्यावेळी तिकीट खिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले. राज आणि रश्मीची लव्हस्टोरी, त्यातील प्रेमगीतं, कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला होणारा विरोध आणि बहरणारी लव्हस्टोरी रसिकांना भावली होती. या सिनेमाने आमिर आणि जुहीलाही रातोरात स्टार बनवलं. आजही या सिनेमाची जादू काही कमी झालेली नाही. कयामत से कयामत सिनेमाची गाणी आजही रसिकांच्या मनावर गारुड घालतात. नुकतंच या सिनेमाच्या रिलीजला ३० वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने १२ मे रोजी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. मुंबईत परळ इथल्या दीपक सिनेमागृहात या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे.यावेळी आमिर खान, जुहीसह या सिनेमाची सगळी स्टारकास्ट रुपेरी पडद्यावर या सिनेमाचा आनंद लुटत जुन्या आठवणींना उजाळा देतील. 
Web Title: After 30 years on the silver screen, it will be seen again from Doom to Qayamat, Raj-Rashmi's Love Story as Aamir-Juhi Rasika
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.