Admittedly, Bollywood is praising Bollywood's most striking performance | 'लव सोनिया'तल्या लक्षवेधक परफॉर्मन्समुळे सईची होतेय बॉलिवूडमध्ये प्रशंसा
'लव सोनिया'तल्या लक्षवेधक परफॉर्मन्समुळे सईची होतेय बॉलिवूडमध्ये प्रशंसा

ठळक मुद्दे 'लव सोनिया' हा चित्रपट देह विक्री व्यवसायातील भीषण वास्तवाकडे लक्ष वेधतो'लव सोनिया' चित्रपटात सई अंजलीच्या भूमिकेत

'लव सोनिया' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अभिनेत्री सई ताम्हणकर हिने साकारलेल्या अंजलीच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक होत आहे. 'लव सोनिया' पाहिलेल्या प्रत्येकाच्या तोंडी सध्या सईची प्रशंसा ऐकायला मिळत आहे.

बॉलिवूडमधल्या कॅटरीना कैफ, अनिल कपूर, विकी कौशल अशा अनेक सेलिब्रिटींनी 'लव सोनिया' सिनेमा पाहिल्यावर सईचे भरभरून कौतूक केले. एवढेच नाही, तर अनेक बॉलिवूड ट्रेड पंडित आणि समीक्षकांनीही सिनेमा पाहिल्यावर सईचे खूप कौतूक केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'लव सोनिया' सिनेमातला सईचा सहज वावर, आत्मविश्वास बॉलिवूड चाहत्यांची मने जिंकून गेला. सईने 'गजनी', 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट', 'हंटर' सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यावर लव सोनिया ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात फ्रिडा पिंटो, डेमी मोर सारखे कलाकार असताना आपल्या अभिनयाची छाप बॉलिवूडकरांवर सोडणे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. 'लव सोनिया'मूळे सईने बॉलिवूडलाच नाही, तर वर्ल्ड सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही आपण एक सशक्त अभिनेत्री असल्याचे दाखवून दिले आहे.
 'लव सोनिया' हा चित्रपट देह विक्री व्यवसायातील भीषण वास्तवाकडे लक्ष वेधतो. मृणाल ठाकूर या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. तिने यात सोनिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. बहीणीचा शोध घेत घेत ती स्वत: देहविक्री व्यवसायाच्या दलदलीत फसते, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.


Web Title: Admittedly, Bollywood is praising Bollywood's most striking performance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.