आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच झळकणार ह्या 'दंगल गर्ल'सोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 04:23 PM2019-02-17T16:23:04+5:302019-02-17T16:24:03+5:30

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर बऱ्याच कालावधीपासून रुपेरी पडद्यापासून लांब होता. मात्र लवकरच तो रुपेरी पडद्यावर झळकणार आहे

Aditya Roy Kapur will be seen for the first time with this 'Dangle Girl' | आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच झळकणार ह्या 'दंगल गर्ल'सोबत

आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच झळकणार ह्या 'दंगल गर्ल'सोबत

googlenewsNext



बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर बऱ्याच कालावधीपासून रुपेरी पडद्यापासून लांब होता. मात्र लवकरच तो रुपेरी पडद्यावर झळकणार आहे आणि तेही 'दंगल गर्ल' फेम सान्या मल्होत्रासोबत. ते दोघेही पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ते दोघे दिग्दर्शक अनुराग बासूच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडियावर तिघांचा एक खास फोटो शेअर करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.


आदित्य रॉय कपूर बऱ्याच काळापासून चित्रपटापासून दूर होता आणि अलिकडेच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचे अकाउंट सुरू केले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात होता. त्याने सान्या आणि अनुराग बासुसोबतचा हा फोटो शेअर केला आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, हा चित्रपट अॅक्शन आणि कॉमेडीपट असल्याचे बोलले जात आहे. ६ सप्टेंबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल. 



सान्या मल्होत्राला 'दंगल' चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत फातिमा सना शेख झळकली होती. त्यानंतर ती आयुषमान खुरानासोबत 'बधाई हो' या चित्रपटातही झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आता आदित्य रॉय कपूरसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. आता या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ पाडेल का हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Aditya Roy Kapur will be seen for the first time with this 'Dangle Girl'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.