'संजू' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री दिसणार वेब सीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 02:13 PM2018-07-19T14:13:51+5:302018-07-19T14:20:11+5:30

एप्लॉस एण्टरटेन्मेंटचे संस्थापक समीर नायर 2016 साली प्रसारीत झालेली युएस सीरिज 'आयविटनेस'चा हिंदी रिमेक घेऊन येत आहेत.

'This' actress will appear in the web series | 'संजू' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री दिसणार वेब सीरिजमध्ये

'संजू' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री दिसणार वेब सीरिजमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देडिटेक्टिव्ह वेब सीरिजमध्ये दिसणार मनीषा कोईरालायुएस सीरिज 'आयविटनेस'ची कथा फिरते दोन मुलींभोवती

अभिनेता संजय दत्तचा बायोपिक 'संजू'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका अभिनेता रणबीर कपूरने केली असून त्याच्या अभिनयाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. तसेच या चित्रपटातील इतर कलाकारांच्या कामाचेही खूप कौतूक झाले. या चित्रपटात अभिनेत्री मनीषा कोईरालाने साकारलेली नरगिसची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. या चित्रपटानंतर आता मनीषा कोईराला वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. 


मनीषा कोईराला एका डिटेक्टिव्ह वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. एप्लॉस एण्टरटेन्मेंटचे संस्थापक समीर नायर 2016 साली प्रसारीत झालेली युएस सीरिज 'आयविटनेस'चा हिंदी रिमेक घेऊन येत आहेत आणि त्यात मनीषाला मुख्य भूमिकेसाठी साइन केले आहे. तिला ही भूमिका खूप आवडली असून या सीरिजबद्दल जाणून घेतल्यानंतर तिने काम करण्यासाठी होकार दिला आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन चंदन अरोरा करणार आहेत. अद्याप या वेबसीरिजचे शीर्षक ठरले नाही. चंदन यांनी 'क्रिश 3', 'की अॅण्ड का' आणि 'पॅडमॅन' या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. सध्या मनीषाकडून शूटिंगच्या तारखा घेण्याच्या प्रयत्न वेब सीरिजची टीम करते आहे.
'आयविटनेस'ची कथा दोन मुलींभोवती फिरते. त्या दोघी एकमेकींमध्ये प्रेम शोधत असतात आणि एकेदिवशी त्या एका गुन्ह्याच्या साक्षीदार बनतात. यावर आधारीत ही वेब सीरिज आहे. आफ्टर ऑवर्सच्या रिपोर्टनुसार मनीषाने सांगितले की, 'काही आणखीन ऑफर्सकडे माझे लक्ष आहे. कोणकोणते चित्रपट कधी शूट करायचे आहे, हे ठरल्यानंतर मी आगामी प्रोजेक्टबद्दल सांगेन.'

Web Title: 'This' actress will appear in the web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.