The actress was unconscious on the sets due to the summer! | उन्हाळ्यामुळे ‘ही’ अभिनेत्री सेटवरच पडली बेशुद्ध!!

तेलगू आणि कन्नड चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री कृती खरबंदा आता हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावत आहे. सध्या ती अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटाची शूटिंग करीत असून, अलाहाबादमध्ये ही शूटिंग सुरू आहे. ४१ अंश डिग्री तपमान असलेल्या या शहरात आउट डोअर शूटिंग करताना सगळ्याचाच कस लागत आहे. अशात एक अप्रिय घटना घडली असून, वाढत्या तपमानामुळे कृती खरबंदा अचानकच सेटवर बेशुद्ध झाल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली. 

चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, उन्हाचा जबरदस्त कडाका असल्याने कृती एकदा नव्हे तर दोनदा बेशुद्ध झाली. बेशुद्ध होण्याअगोदर तिला डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. तेव्हा तिने १० मिनिटे शूटिंगमधून ब्रेक घेतला. ब्रेकमधून आल्यानंतर तिने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली. यादरम्यान तिने बरेचसे सीन्स केले. कृती सातत्याने एकापाठोपाठ एक सीन्स शूट करीत होती; मात्र सकाळपासूनच तिला कमजोरी जाणवत होती. पुढे तिला ३ वाजेच्या दरम्यान चक्कर यायला लागली. काही वेळानंतर ती सेटवरच बेशुद्ध झाली. तिला जबरदस्त हिट स्ट्रोक बसला होता. त्यानंतर तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. काही औषधोपचार घेतल्यानंतर कृती सामान्य झाली असून, पुन्हा एकदा ती शूटिंगसाठी तयार झाली आहे. विनोद बच्चन आणि सौंदर्या प्रॉडक्शनद्वारा निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन रत्ना सिन्हा करीत आहेत. कमल पांडे यांनी पटकथा लिहिली असून, राजकुमार राव आणि कृती खरबंदा यामध्ये प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. 
Web Title: The actress was unconscious on the sets due to the summer!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.