The actress in 'Slumdog Millionaire' was supposed to work in Bar, work area selected by mother! | ‘स्लमडॉग मिलेनियर’मधील ‘या’ अभिनेत्रीला बारमध्ये करायचे होते काम, आईमुळे निवडले अभिनय क्षेत्र!

२००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत इतिहास लिहिला. कारण या चित्रपटाने सिनेमासृष्टीतील सर्वाधिक प्रतिष्ठित असा आॅस्कर पुरस्कार मिळविला. आॅस्कर सोहळ्यात फारच क्वचित नाव येत असलेल्या भारताच्या ए. आर. रहमानला या पुरस्काराने दोन आॅस्कर मिळवून दिले. शिवाय अभिनेत्री फ्रिडा पिंटो हिलादेखील या चित्रपटाने एक वेगळेच वलय मिळवून दिले. खूपच कमी कालावधीमध्ये मॉडलिंग जगतात नाव कमविणाºया फ्रिडाचा हा पहिलाच चित्रपट होता. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, फ्रिडाला मॉडलिंग किंवा अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करायचे नव्हते? होय, फ्रिडाला एका बारमध्ये काम करायचे होते. 

फ्रिडाला स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाने जगभरात ओळख मिळवून दिली. आज तिला जगात मॉडलिंग आणि अभिनयासाठी ओळखले जाते. परंतु खूपच कमी लोकांना माहिती आहे की, फ्रिडाला मॉडलिंग आणि अ‍ॅक्टिंगमध्ये काहीच रस नव्हता. तिला बारमध्ये काम करायचे होते. १८ आॅक्टोबर १९८४ मध्ये मुंबईतील कस्बे मॅँगलोर परिसरात जन्मलेली फ्रिडा मेंग्लोरीयन कॅथोलिक परिवारातून आहे. एका मुलाखतीत फ्रिडाने सांगितले होते की, ‘मी पूर्णपणे शुद्ध भारतीय आहे. मात्र माझा परिवार कॅथोलिक आहे. मला कधीच असे वाटत नव्हते की, आपण मॉडलिंग किंवा अ‍ॅक्टिंग करावी.
 

वास्तविक फ्रिडाला बकार्डी शॉट सर्वर बनायचे होते. तिला ग्राहकांना ड्रिंक सर्व करायची होती. मात्र तिच्या आईला तिचा हा जॉब पसंत नव्हता. त्यांनी फ्रिडाला सांगितले होते की, तुला लोकांचे मनोरंजनच करायचे असेल तर मग तू दुसरे क्षेत्र का निवडत नाहीस? तेव्हा फ्रिडाने मॉडलिंग सुरू केली. मॉडलिंग अगोदर तिने एका अमेरिकी कॉर्टून ला ला चे कॅरेक्टरही साकारले आहे. असो, ‘स्लमडॉग मिलेनियर’मध्ये फ्रिडाच्या अपोझिट देव पटेल याने काम केले होते. 
Web Title: The actress in 'Slumdog Millionaire' was supposed to work in Bar, work area selected by mother!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.