सारा अली खानची इच्छा पूर्ण! कार्तिक आर्यनसोबत ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 10:16 AM2018-12-23T10:16:17+5:302018-12-23T10:17:06+5:30

लोकमत मोस्ट स्टाईलिश अवॉर्डमध्ये कार्तिक आर्यनला भेटण्याची सारा अली खानची इच्छा पूर्ण झाली. आता साराची यापुढची इच्छा पूर्ण होणार आहे.

actress sara ali khan to romance with kartik aaryan in film love aaj kal 2 | सारा अली खानची इच्छा पूर्ण! कार्तिक आर्यनसोबत ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!!

सारा अली खानची इच्छा पूर्ण! कार्तिक आर्यनसोबत ‘या’ चित्रपटात करणार रोमान्स!!

googlenewsNext
ठळक मुद्दे २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान व दीपिका पादुकोणच्या ‘लव आजकल’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सेकंड पार्ट बनणार आहे आणि दिग्दर्शक इम्तियाज अलीने या चित्रपटासाठी कार्तिक व साराला साईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत मोस्ट स्टाईलिश अवॉर्डमध्ये कार्तिक आर्यनला भेटण्याची सारा अली खानची इच्छा पूर्ण झाली. खुद्द ‘सिम्बा’ रणवीर सिंगने कार्तिक व साराची भेट घडवून आणली. अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. योगायोगाने ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’मध्ये कार्तिक व सारा दोघेही आलेत आणि रणवीरने नेमकी हीच संधी साधत दोघांचीही भेट घडवून आणली. नुसतीच भेट नाही तर दोघांचेही हात एकमेकांच्या हातात देत, सारा व कार्तिकची जाम मजा घेतली. आता साराची यापुढची इच्छा पूर्ण होणार आहे. होय, सैफ अली खानची ही लाडकी लेक आता कार्तिकसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अर्थात आॅनस्क्रीन रोमान्स. होय, २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान व दीपिका पादुकोणच्या ‘लव आजकल’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सेकंड पार्ट बनणार आहे आणि दिग्दर्शक इम्तियाज अलीने या चित्रपटासाठी कार्तिक व साराला साईन करण्याचा निर्णय घेतला आहे.


फिल्मफेअर या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत खुद्द इम्तियाज अली यांनी याबद्दल माहिती दिली. आमच्या टीमने ‘लव आजकल’च्या सीक्वलवर काम सुरु केले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये असणार आहे आणि कार्तिकच्या अपोझिट आम्ही साराचे नाव निश्चित केले आहे, असे इम्तियाजने सांगितले. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा होईल असे कळतेय.


साराने अलीकडे ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. लवकरच तिचा ‘सिम्बा’ रिलीज होतोय. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. तूर्तास सारा व रणवीर ‘सिम्बा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दुसरीकडे कार्तिकने ‘प्यार का पंचनामा’मधून आपले बॉलिवूड करिअर सुरु केले होते.

Web Title: actress sara ali khan to romance with kartik aaryan in film love aaj kal 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.